जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अर्थकारण

कोपरगावात…या नूतन कार्यालयाचे उदघाटन होणार संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरातील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कोपरगाव येथील फर्निचरसह साधारण ०४ कोटी रुपये खर्चाच्या “जीवन ज्योती” या नूतन व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ईमारतीचे लोकार्पण येत्या बुधवार दि.०७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महामंडळ मान्यवरांच्या उपस्थितीतीत संपन्न होत आहे.त्यासाठी आयुर्विमा मंडळाच्या ग्राहकांनी व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

एल.आय.सी.च्या कोपरगाव शाखेला स्वतंत्र स्वमालकीचे कार्यालय नव्हते सदर शाखा कोपरगाव पीपल्स बँकेच्या शाखेत कार्यरत होती.अनेक दशके येथे व्यवसाय केल्यावर मात्र साधारण पाच वर्षांपूर्वी सदर शाखेच्या भूखंडासाठी प्रयत्न करण्यात आले आहे.त्यासाठी कोपरगाव पंचायत समितीच्या पश्चिमेस व भारतीय दूरसंचार निगम कार्यालयाच्या उत्तरेस वर्तमान ०७ आर जागा राज्य शासनाकडून घेण्यात आली आहे.सदर जागेवर तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे.त्यात एकूण ०६ हजार ५०० चौ.फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ (एल.आय.सी.) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.एल.आय.सी.ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.१८१८ मध्ये ‘ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी’ ही भारतात जीवनविमा व्यवसाय सुरू करणारी पहिली विमा कंपनी,१९२८ मध्ये भारतातील जीवन तसेच इतर विम्यांची सांख्यकीय माहिती गोळा करता यावी, यासाठी,’भारतीय विमा कायदा’ संमत करण्यात आला.१९५६ मध्ये विमा सेवा आणि निधी सेवा पुरविणाऱ्या सुमारे २४५ भारतीय तसेच परकीय कंपन्या भारत सरकारने ताब्यात घेऊन त्यांचे राष्ट्रीयकरण केले.१९ जून १९५६ ला संसदेत ‘एल.आय. सी.’ कायदा संमत करून वरील कंपन्यांच्या एकत्रीकरणातून १ सप्टेंबर १९५६ ला एल.आय.सी.ची स्थापना करण्यात आली.एल.आय.सी.चे जीवनविम्याचे हप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख साधन राहिले आहे.मुंबईमध्ये एल.आय.सी.चे मुख्यालय असून तिची ८ क्षेत्रीय कार्यालये,११३ विभागीय कार्यालये,२०४८ शाखा,५४ ग्राहक सेवा केंद्रे व २५ महानगर सेवा केंद्रे आहेत.गेले अनेक दशके एल.आय.सी.हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे.सध्या १३ लाख ३७ हजार ०६४ इतके एल.आय.सी.एजंट भारतभर कार्यरत आहेत.स्थापनेपासून गेल्या ६० वर्षात आणि उदारीकरणानंतरही जीवन विम्यात एल.आय.सी.ची मक्तेदारी राहिली आहे.या महामंडळाची कोपरगावतही शाखा असून तिने देशभरातील शाखांत मोठा पल्ला गाठलेला आहे.

सदर शाखेला मात्र स्वतंत्र कार्यालय नव्हते.त्यामुळे व्यवसायासाठी ती कोपरगाव पीपल्स बँकेच्या शाखेत कार्यरत होती.अनेक दशके येथे व्यवसाय केल्यावर मात्र साधारण पाच वर्षांपूर्वी सदर शाखेच्या भूखंडासाठी प्रयत्न करण्यात आले आहे.त्यासाठी कोपरगाव पंचायत समितीच्या पश्चिमेस व भारतीय दूरसंचार निगम कार्यालयाच्या उत्तरेस वर्तमान ०७ आर जागा राज्य शासनाकडून घेण्यात आली आहे.सदर जागेवर तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे.त्यात एकूण ०६ हजार ५०० चौ.फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे.या शिवाय स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून असे हे एकमेव कार्यालय मानले जाईल.

सदर कार्यालय हे कार्पोरेट पद्धतीचे वातानुकूलित असून वयोवृद्ध ग्राहकांना विद्युत उद्वहकाची सोय प्रस्तावित करण्यात आलेली आहे.सदर कार्यालय आगामी काळात सौर उर्जेवर कार्यरत राहणार असून या इमारतीत रेन हार्वेस्टिंग व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close