जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पुन्हा एकदा गोवंश कत्तल सुरु ? कोपरगावात दोन गुन्हे दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

संवत्सर मनाई वस्ती येथे स्वतंत्र कत्तलखाना उपलब्ध करूनही कोपरगाव शहरातील नगरपरिषदेपासून हाकेच्या अंतरावरील संजयनगर उपनगरात अद्यापही अवैध कत्तलखाना सुरूच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून या विरुद्ध रात्री कोपरगाव शहर पोलिसानी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास सक्रिय होऊन संजयनगर या उपनगरातील आयेशा कॉलनी येथे सुरु असलेल्या अवैध गोवंश बाळगणाऱ्याविरुद्ध कारवाई केली असून त्यातील आरोपी रज्जाक इसाक कुरेशी व मुज्जू हुसेन कुरेशी व अन्य एका गुन्ह्यात पप्पू फकीर कुरेशी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यातील तिन्ही आरोपी फरार झाले आहे.या घटनेने कोपरगाव शहर परिसरात खळबळ उडाली आहे.

“संबंधित कसायांसाठी आपण पालिकेच्या वतीने एक कोटी रुपयांचा खर्च करून मनाईवस्ती येथे कत्तलखाना सुरु केला होता व त्यासाठी संबधीत इसमांना घेऊन नगर पर्यंत पाठपुरावा केला होता.त्यामुळे आता तरी त्यांनी शहरातील गोवंश हत्त्या बंद करून मनाई येथील कत्तलखान्याचा वापर करावा कोपरगाव शहरातील शांतता कायम राखावी”-विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव शहरातील संजयनगर येथील बेकायदा कत्तलखाना शहराच्या आरोग्यासाठी हानिकारक होता.म्हणून औद्योगिक वसाहती जवळील संवत्सर ग्रामपंचायत हद्दइत”मनाई” येथे सोयीसुविधा युक्त कत्तलखाना “स्लॉटरहाऊस” कोपरगाव नगरपरिषदेने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या कालखंडात सुरू करून म्हैसवर्गीय जनावरे कत्तल करण्याची सोय करून दिलेली आहे.असे असतांनाही संजयनगर येथे बेकायदेशीरपणे गोवंश हत्त्या होत होती व आजही बिनबोभाट सुरु असल्याचे वारंवार निष्पन्न होत आहे.याबाबत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार या घटकांना सांगूनही असे प्रकार सर्रास सुरू होते.याच कसाई वर्गाला विक्रीसाठी कोपरगाव नगरपरिषदने जागाही उपलब्ध करून दिली आहे.मात्र अनेक जण संजयनगर येथे कत्तल करून त्याचे पाणी थेट गटाराद्वारे पवित्र गोदावरी नदीत जात आहे.त्याबाबत सराला बेटांचे महंत राममगिरीजी महाराज यांनी आवाज उठवला होता मात्र त्यांनाही हि मंडळी दाद देत नसल्याचे उघड होत असल्याचे दिसत आहे.रात्री अपरात्री गोवंश कत्तल करून नगरपरिषद,पोलीस व शासनाच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम सुरू आहे.संबंधितांना अनेकदा सांगूनही मनाई येथील अधिकृत कत्तलखान्याचा वापर होत नाही.गोवंश हत्त्या करून शहरवासीयांच्या भावनांशी खेळण्याचे काम सुरू आहे.रात्री अपरात्री बेकायदा कत्तल करून रक्त-मांस नाल्यात व नाल्यातून नदीत सोडल्याने सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले आहे” असा गंभीर आरोप नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी गतवर्षी मार्च महिन्यात एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस देऊन केला होता.

कोपरगाव शहर पोलिसांनी घेतलेली दिसत असून आज रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या पथकाने संजयनगर आयेशा कॉलनी येथे धाड टाकून कारवाई केली आहे.त्यावेळी पोलिसांना तेथे वरील तीन आरोपी संजयनगर भागात उघड्यावर गोवंश कत्तलीसाठी बाळगल्याने आढळून आले आहे.त्यावेळी त्यांनी घटनास्थळी १० हजार रुपये किमतीची काळ्या-पांढऱ्या रंगाची जर्शी गाय,९ हजार रुपये किमतीची काले रंगाची शिंगे नसलेली गाय,एक १५ हजार रुपये किमतीची तांबड्या रंगाची जर्सी गाय,एक १० हजार रुपये किमतीचा जर्शी गोऱ्हा,९ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची पांढरे ठिपके असलेली जर्शी गाय,१० रुपये किमतीची काळे-पांढरे रंगाची जर्शी गाय असा एकूण ६३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.त्या बाबत पोलिसांनी आरोपी विरुद्ध कारवाई केली असली तरी या कारवाईत आरोपी मात्र फरार झाले आहे.

दरम्यान याच ठिकाणी दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी पप्पू फकीर कुरेशी रा.सुभाषनगर याचे विरुद्ध अशीच कारवाई केली आहे.त्यात पोलिसांनी १२ हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची पोटाला व पायाला पांढरा पत्ता असलेली जर्शी गाय,एक १५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची पोटाला व पायावर पांढरा पत्ता असलेली गाय,एक ५ हजार रूपये किंमत असलेले जर्शी वासरू,एक ५ हजार रुपये किमतीचे तांबडे वासरू असा ३२ हजारांचा अवैज जप्त केला आहे.असा दोन्ही घटनातील मिळून ९९ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले व पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिस कॉ.विलास लाला मासाळ (वय-३४) यांनी या प्रकरणी आरोपी रज्जाक कुरेशी व मुज्जू कुरेशी व पप्पू फकीर कुरेशी यांच्या विरुद्ध आपल्या दप्तरी आज पहाटे ४ च्या सुमारास दोन स्वतंत्र गु.र.क्रं.४१४ व ४१५ /२०२२ प्राण्यास निर्दयपणे वागणविण्याचा कायदा अधिनियम १९६०चे कलम ११(१)(ह)व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा आधी नियम कलम १९९५ चे कलम ५,(ब) व ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.ए.एम.दारकुंडे व पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close