गुन्हे विषयक
बांधावर गवत टाकले,महिलेस मारहाण,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या माहिलेच्या भुईमुगाचे शेतात बांधावर गवत टाकल्याच्या किरकोळ कारणावरून आरोपी सुनील कारभारी थेटे याने गजाच्या सहाय्याने मारहाण केल्याचा गुन्हा तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी महिला निर्मला प्रभाकर थेटे (वय-५५) यांनी दाखल केला आहे त्यामुळे करंजी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिला निर्मला थेटे या आपल्या भुईमुगाच्या शेतात खुरपणीचे काम करत होत्या त्यांनी त्यातून निघणारे गवत स्वाभाविक पणे आपल्या सामायिक बांधावर टाकले होते.त्यातून फिर्यादीचा राग अनावर झाला होता.त्याने घटनास्थळी येऊन फिर्यादी महिला निर्मला थेटे यांना उद्देशून,”बांधावरील गवत उचला,बांध काही तुमच्या बापाचा नाही” असे म्हणून शिवीगाळ करून हातातील लोखंडी गजाने मारहाण केली आहे.
वर्तमानात रब्बी पिके काढणीला आली असून काही पिकांची अद्याप अंतर्गत मशागत जोरात सुरु आहे.त्यामुळे शेतकरी सकाळी आपल्या शेतात जाताना दिसत असून त्यावरून किरकोळ कारणारून मारहाणी होत असून अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक २७७ मध्ये नुकतीच दि.२३ मार्च रोजी सकाळी ०९ वाजेच्या सुमारास घडली आहे.त्या वेळी फिर्यादी महिला निर्मला थेटे या आपल्या भुईमुगाच्या शेतात खुरपणीचे काम करत होत्या त्यांनी त्यातून निघणारे गवत स्वाभाविक पणे आपल्या सामायिक बांधावर टाकले होते.त्यातून फिर्यादीचा राग अनावर झाला होता.त्याने घटनास्थळी येऊन फिर्यादी महिला निर्मला थेटे यांना उद्देशून,”बांधावरील गवत उचला,बांध काही तुमच्या बापाचा नाही” असे म्हणून शिवीगाळ करून हातातील लोखंडी गजाचे सहाय्याने सदर महिलेस मारहाण केली आहे.त्यात सदर महिलेचा डावा हातास गंभीर दुखापत झाली आहे.
त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.व उपचारार्थ कोपरंगव शहरातील एका खाजगी वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले व हे.कॉ.निजाम शेख यांनी भेट दिली आहे.या प्रकरणी महिलेचा हात मोडला असल्याची माहिती आहे त्यामुळे कलम वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या प्रकरणी फिर्यादी महिला निर्मला थेटे यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या दप्तरी नोंद केली क्रं.१४४/२०२३ भा.द.वि. कायदा कलम-३२४,५०४,५०६ अन्वये नुकताच नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.निजाम शेख हे करीत आहेत.