अपघात
कोपरगाव तालुक्यात दोघांचे अकस्मात निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील खडकी उपनगर असलेल्या ठिकाणचे इसम हनुमंत नामदेव पवार (वय-५२) व शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी इसम सुरेश मुरलीधर कुदळे (वय-३२) यांचे अकस्मात निधन झाले आहे.त्यात पवार यांचे छातीत अचानक दुखू लागल्याने तर कुदळे यांचे अचानक निधन झाले आहे.या दोघांची कोपरगाव शहर पोलिसांनी अकस्मात नृत्यु नोंद पुस्तिकेत नोंदणी केली आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दोन्ही घटनेतील मयत इसम यांना कोपरगाव येथील डॉ.नाईकवाडे यांचेकडे उपचार्थ दाखल करण्यात आले होते.त्यांनी प्राथमिक तपासणी केल्यावर त्यांना मृत घोषित केले आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी डॉ.नाईकवाडी यांचे खबरी वरून अकस्मात मृत्यू नोंद पुस्तिका क्रं.५७ व ५८ /२०२१ सी.आर.पी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दारकुंडे व पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.