जाहिरात-9423439946
अपघात

माजी नगराध्यक्ष कुदळे यांच्या कारचा अपघात,केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावले…!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे (वय-७६) काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबईकडून नाशिक-कोपरगावकडे येत असताना कसारा घाट ओलांडल्यावर असलेल्या एका वळणावरून भरधाव वेगात येत असताना अचानक एक दरडीचा दगड समोर दिसल्याने चालकाचे एका क्षणी नियंत्रण सुटून त्याची कार हि दुसऱ्या मार्गावर उलटून झालेल्या अपघातात समोरील ट्रकने त्यांना उडवल्याने त्यांच्या महिंद्रा कार एक्स.यू.व्ही.-३०० (क्रं.एम.एच.१७ बी.एक्स.२२८८) चे मोठे नुकसान होऊन त्यांच्या डोक्याला किरकोळ इजा होऊन त्यांच्यासह चालक असलेले त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक दिनार कुदळे यांचाही जीव या अपघातात चमत्कारीकरित्या वाचला आहे.

“कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष पद्मकांत कुदळे यांना थोडा डोक्याला मार लागला असला तरी ते पूर्ण सावध असून त्यांच्या हितचिंतकांनी काळजी करून नये” असे आवाहन माजी नगरसेवक दिनार कुदळे यांनी केले आहे.या अपघाताने,”देव तारी त्याला कोण मारी” या मराठी म्हणीचा प्रत्यय आला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांत उमटल्या आहेत.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे हे आपल्या वरील क्रमांकाच्या कारने आपल्या काही खाजगी कामासाठी मुंबई येथे गेले होते.ते शनिवार दि.०३ जुलै रोजी दुपारी ०२ वाजेच्या सुमारास कसारा घाट ओलांडून पुढे इगतपुरी तालुक्यातील आंबापाडाई या ग्रामपंचायतीच्या हद्दीत आले असता त्यांच्या कार समोर अचानक एक दरडीचा कोसळलेला दगड आल्याची बाब त्यांचे चिरंजीव चालक असलेल्या दिनार कुदळे यांच्या लक्षात आला मात्र वेग आणि दगड यांच्यात त्यांना आपले वाहन वाचवणे शक्य न झाल्याने त्याची गाडी हि त्या दगडावर जाऊन त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व हि कार थेट दुसऱ्या मार्गावर वेगाने पलटी झाली दरम्यान त्या क्षणी समोरून एक मोठा अवजड ट्रक त्यांना ओलांडून जात असताना त्या ट्रक चालकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याही वेगात त्यांची कार हि चालकाच्या बाजूने धडकलीच व त्यात कारची एक बाजू चक्काचूर झाली असून त्यांनी शीट बेल्ट लावलेला असल्याने व सुरक्षेच्या हवेच्या पिशव्या कार्यरत झाल्याने त्यांचा जीव वाचला आहे.पद्मकांत कुदळे यांच्या डोक्याला मार लागून ५-६ टाके पडले असले तरी ते पूर्णपणे बचावले आहे.या मोठ्या अपघातात त्यांचे चिरंजीव दिनार कुदळे हेही चमत्कारिक रित्या कुठलीही जखम न होता बचावले आहे हे विशेष !

याबाबत यांचेशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी,”या अपघातात आपण केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावलो असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.त्यात त्यांनी आपल्या कारला सुरक्षेच्या हवेच्या पिशव्या असल्याने व आपण सीटबेल्ट लावला असल्यानेच बचावलो” असल्याचे सांगितले आहे.त्यांचे पिताश्री पद्मकांत कुदळे हेही नाशिक येथील अपोलो रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीची राज्याचे मंत्री छगन भुजबळ,माजी खा.समीर भुजबळ यांनी विचारपुस केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.पद्मकांत कुदळे यांना थोडा डोक्याला मार लागला असला तरी ते पूर्ण सावध असून त्यांच्या हितचिंतकांनी काळजी करून नये असे आवाहन माजी नगरसेवक दिनार कुदळे यांनी केले आहे.या अपघाताने,”देव तारी त्याला कोण मारी” या मराठी म्हणीचा प्रत्यय आला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांत उमटल्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close