कोपरगाव तालुका
कोपरगाव शहराला विकासापासून वंचित ठेवण्याचा माजी आ.कोल्हे आसुरी आनंद घेत आहे-नगरसेवक
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“सत्ताधारी आमदार असून देखील नगराध्यक्षपदाने हुलकावणी दिल्यामुळे पक्षात प्रतिमा मलीन झाली याचा राग अजूनही माजी आमदारांच्या मनात धुमसत असून शहरातील नागरिकांविषयी त्यांच्या मनात प्रचंड द्वेष आहे.त्या द्वेषापोटी नगरपरिषदेत असलेल्या पाशवी बहुमताचा उपयोग शहरातील नागरिकांचा बदला घेण्यासाठी केला जात आहे”-मेहमूद सय्यद,अपक्ष नगरसेवक,कोपरगाव नगरपरिषद.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”साडे चार वर्षापूर्वी माजी आमदारांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी शहरवासियांना दाखविलेले स्वप्न राज्यात व केंद्रात सत्ता असून देखील त्या पूर्ण करू शकल्या नाही त्यामुळे शहरातील सुज्ञ मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून घरी बसविले. सत्ताधारी आमदार असून देखील नगराध्यक्षपदाने हुलकावणी दिल्यामुळे पक्षात प्रतिमा मलीन झाली याचा राग अजूनही माजी आमदारांच्या मनात धुमसत असून शहरातील नागरिकांविषयी त्यांच्या मनात प्रचंड द्वेष आहे.त्या द्वेषापोटी नगरपरिषदेत असलेल्या पाशवी बहुमताचा उपयोग शहरातील नागरिकांचा बदला घेण्यासाठी केला जात असून शहरातील विकासकामांना पडद्यामागून माजी आमदारच विरोध करीत आहे. त्याचा त्यांना आज जरी असुरी आनंद मिळत असला तरी त्या आनंदावर कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदार नक्कीच विरजण घालतील असे सय्यद यांनी शेवटी म्हटले आहे.