जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

रस्ता अपघात,तरुण ठार,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार फाटा ते सांगवी भुसार  या रस्त्यावर नानासाहेब जाधव यांचे शेताजवळ नुकताच एक अपघात झाला असून यात रवंदे येथील रहिवासी तरुण हर्षद तान्हाजी धुळे (वय-२५) याचे निधन झाले आहे.मात्र हा कशाने झाला याचा उलगडा होऊ शकला नाही.

  

ही अपघाताची घटना दिनाक १३ एप्रिल रोजी सांगवी भुसार हद्दीत दुपारी ४.२०  वाजेच्या सुमारास घडली आहे.ही दुर्घटना सांगवी भुसार फाटा ते सांगवी भुसार या रस्त्यावर नानासाहेब जाधव यांचे शेताजवळ घडली आहे.अज्ञात वाहनाने त्यास धडक दिली होती.वाहन फरार आहे.

    कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था दूर होण्याची चिन्हे दिसत नाही परिणामी अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशीच एक घटना दिनाक १३ एप्रिल रोजी दुपारी ४.२०  वाजेच्या सुमारास घडली आहे.ही दुर्घटना सांगवी भुसार फाटा ते सांगवी भुसार या रस्त्यावर नानासाहेब जाधव यांचे शेताजवळ घडली आहे.अज्ञात वाहनाने त्यास धडक दिली होती.नजीकच्या नागरिकांनी त्यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते.तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.

    या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.मोनाली पोतदार यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक अनुक्रमे -२७/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम १९४ प्रमाणे नोंद दाखल केली आहे.घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.एस.डी.बोटे  हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close