जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पश्चिम बंगाल मधील ‘त्या’ हिंसाचाराचा कोपरगांव भा.ज.प.च्या वतीने निषेध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

पश्चिम बंगाल येथे नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जरी ममता बैनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला बहुमत मिळाले असले तरी भारतीय जनता पार्टीने देखील तीन जागेवरुन ७६ जागेपर्यंत मजल मारली आहे.मात्र तेथील सत्त्ताधाऱ्यांना आपला पराभव पचनी न पडल्याने त्यांनीसूडबुद्धीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करायला सुरुवात केला असून त्यांच्या घरांवर व कार्यालये,दुकाने आदींवर हल्ले करून त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्यास प्रारंभ केला आहे हि बाब अत्यंत निंदणीय असून या घटनेचा कोपरगाव तेथील भाजपा व हिंदुत्ववादी संघटनांनी कोपरगाव तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देऊन त्या घटनेचा निषेध केला आहे.

संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने पश्चिम बंगाल मध्ये अक्षरशा धुव्वा उडवला.अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली.मात्र आता निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचं दिसून येत असून अनेकांचा बळी गेला आहे त्याचा कोपरगावात निषेध व्यक्त केला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली.संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने अक्षरशा धुव्वा उडवला.अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली.मात्र आता निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांनी आज राज्यपालांना निवदेनही सादर केलं आहे.”निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेल्या हिंसाचारात २४ तासांत १४ लोकांचा मृत्यू झाला असून राज्यात भीतीचं वातावरण आहे.सत्ताधारी पक्ष हातावर हात ठेवून बसला आहे.पोलीस निष्क्रय आहेत.आम्ही राज्यपालांकडे निवेदन घेऊन आलो होतो,त्यांनी निवेदनाचा स्वीकार केला आणि आश्वासन दिलं.” अशी माहिती पश्चिम बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांनी दिली आहे.
या सर्व घटनांचा निषेध म्हणुन कोपरगांव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना निवेदन देण्यात आले आहे.सदर निवेदनावर विनायक गायकवाड़,विनीत वाड़ेकर,चेतन खुबानी,मनोहर कृष्णानी,योगेश वाणी यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close