कोपरगाव तालुका
विठ्ठलराव रहाणे यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
विठ्ठलराव रहाणे यांचे निधन
कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव वामन रहाणे (वय-७८)यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, मुली,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.विठ्ठलराव रहाणे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व कर्तव्य कठोर म्हणून बहादरपुर आणि परिसरात परिचित होते.त्यांनी निळवंडे धरणाच्या कालव्याच्या निळवंडे कालवा कृती समितीच्या महत्वपूर्ण लढ्यात योगदान दिले होते.या कालव्याच्या कामात सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या संगमनेर तालुक्यातील कौठे कमलेश्र्वर येथील सर्वात मोठ्या बोगद्याच्या कामात निधी मंजूर करण्यात बहादरपूर ग्रामस्थांसह योगदान दिले होते.या शिवाय बहादरपुर ग्रामपंचायत मधील विकास कामात मोठे योगदान दिले होते.त्यामुळे ते अनेकांच्या स्मरणात आहेत.
दरम्यान त्यांच्यावर बहादरपूर येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.