आरोग्य
आत्मा मालीक हॉस्पिटल आता अत्याधुनिक-पोकळे
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील,’आत्मा मालीक हॉस्पिटल ‘ हे आता अत्याधुनिक सुविधांनी सज्ज करण्यात आले असून यातून जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात सुविधा पुरविण्यात येत असल्याचे प्रतिपादन ‘आत्मा मालीक हॉस्पिटल’चे व्यवस्थापक सुनील पोकळे यांनी जवळके येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते नवनाथ थोरात हे होते.
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे ‘आत्मा मालीक हॉस्पिटल’ व जवळकें ग्रामपंचायत,जनमंगल ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिर व मोफत औषधांचे शिबिर आयोजित केले होते.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,सेवानिवृत्त उपअभियंता एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात,विजय थोरात,अण्णासाहेब भोसले,डॉ.अंकुश रायते,डॉ.आशुतोष निंभोरकर,डॉ.कांचन वालझाडे,डॉ.सोनाली ढोकणे,डॉ.निकिता बुलबुले,ग्रामपंचायत सदस्या मीना विठ्ठल थोरात,नवनाथ शिंदे,संतोष थोरात,अक्षय कंड्रे,प्रसिध्दी प्रमुख भाऊसाहेब खालकर,नामदेव थोरात,जयराम वाकचौरे,गोरक्षनाथ शिंदे,आदीसह बहुसंख्येने ग्रामस्थ व रुग्ण उपस्थित होते.
सदर प्रसंगी प्रास्तविक नानासाहेब जवरे यांनी केले त्यावेळी त्यांनी जवळके ग्रामपंचायतीने या पूर्वी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार,माजी केंद्रीय मंत्री स्व.मोहन धारिया यांच्या हस्ते एक लाखाहून अधिक वृक्ष लागवडीचा पुरस्कार,माजी पालक मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते लोकराज्यग्राम,तंटामुक्त ग्राम,व नुकताच सरपंच सारिका थोरात यांचेसह सदस्य आदींना जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ,मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष येरेकर यांच्या हस्ते,’क्षयरोग निर्मूलन पुरस्कार’ आदी पुरस्कार मिळवले असून दुष्काळी भागातील गावांसाठी मोठे योगदान दिले असल्याची माहिती दिली आहे.तर वर्तमानात अनेक प्रकल्पावर काम सुरू असल्याची माहिती दिली आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन सुनील पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.तर उपस्थितांचे आभार एस.के.थोरात यांनी मानले आहे.
सदर प्रसंगी डोळे,तपासणी,हाड तज्ञ,फिजिओथेरपिस्ट,आदी सह विविध तज्ञ डॉकटर उपस्थित होते.त्यांनी मोठ्या संख्येने रुग्णांची तपासणी केली आहे.यावेळी पोकळे यांनी जवळके येथे आगामी काळात ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांच्या सहकार्याने प्रत्येक शुक्रवारी आठवडे बाजाराचे दिवशी दुपारी एक ते चार या दरम्यान सदर शिबिर आयोजित केले जाणार असल्याची माहिती दिली आहे.