जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जगावेगळे

पोलीस अधिकाऱ्यांच्या सावधपणामुळे वाचला तिघांचा जीव !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरानजीक असलेल्या गोदावरी नदीवरील पुलावरून एका जोडप्याने आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असता त्या ठिकाणी गस्तीवर असलेल्या शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सावधपणा दाखवून या जोडप्याचे मत परिवर्तन करण्यात यश मिळवले आहे.त्याबाबत कोपरगाव शहरात त्यांचे कौतुक होत आहे.

ज्यांना जीव नकोसा वाटतो आणि जे आत्महत्येसाठी नियोजन करतात त्यांच्यात आत्महत्या घडण्याचे प्रमाण जास्त असते.काही वेळेला मनासारखे करून घेण्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तीला घाबरवण्यासाठी आत्महत्येची धमकी दिली जाते.त्याबद्दल काही केले नाही तर क्रमाने ही सवय वाढून आत्महत्येचा प्रयत्नही केला जातो.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या मोठया पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना रात्रीच्या सुमारास घडली आहे.ती पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या प्रयत्नामुळे उघड झाली आहे.

वर्तमान कालखंडात १५ ते २५ वर्षांमधील वयोगटांत आत्महत्येचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत चालले आहे ही चिंतेची बाब आहे.या वयोगटात अभ्यासाचा ताण,परीक्षेत अपयश आणि प्रेमभंग ही तीन प्रमुख कारणे आहेत.आणखी एक म्हणजे जगाच्या तुलनेच भारतात स्त्रियांमधील आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे.सामाजिक दृष्टय़ा दुय्यम स्थान आणि हुंडाबळी ही दोन कारणे यासाठी सांगितली जातात.रागीट,आततायी,हट्टी,टोकाचा परफेक्शनिस्ट आणि अप्रगल्भ असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येची वृत्ती जास्त असते.मानसिक आजारांमध्येही आत्महत्या घडू शकते.याचे सर्वात जास्त प्रमाण नैराश्यात असते.

ज्या व्यक्ती आत्महत्येचे विचार करतात,ज्यांना जीव नकोसा वाटतो आणि जे आत्महत्येसाठी नियोजन करतात त्यांच्यात आत्महत्या घडण्याचे प्रमाण जास्त असते.काही वेळेला मनासारखे करून घेण्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तीला घाबरवण्यासाठी आत्महत्येची धमकी दिली जाते.त्याबद्दल काही केले नाही तर क्रमाने ही सवय वाढून आत्महत्येचा प्रयत्नही केला जातो.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरातील नगर-मनमाड या महामार्गावरील गोदावरी नदी पात्रावरील पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना रात्रीच्या सुमारास त्याच ठिकाणाहून कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे योगायोगाने गस्तीसाठी जात असताना चव्हाण व त्याची पत्नी असे एक जोडपे आपल्या दोन वर्षाचे लहान मुलासह या पुलाजवळ घोटाळताना आढळून आले.याबाबत त्यांना शंका आल्याने त्यांनी त्यांच्या जवळ गाडी उभी करून याबाबत सविस्तर चर्चा केली असता सदर जोडपे आत्महत्या करण्यासाठी आले असल्याची धक्कादायक माहिती त्यांच्या हाती आली आल्याने तेही हादरले.मात्र त्यांनी वेळीच सावधपणा दाखवून त्यांना आपल्या गाडीत बसण्यास सांगून त्यांचेशी गोड-गोड बोलून पोलीस ठाण्यात आणले व त्यांचे समुपदेशन करून त्यांचे मत परिवर्तन केले व त्यांच्या नातेवाईकांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले आहे.त्यामुळे एका जोडप्यासह एका बालकाचाही जीव वाचला आहे.

याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देसले यांनीच ही बातमी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close