जगावेगळे
एकाग्रतेकडे मुलं फिरवतात पाठ,चिंता अनुवंशिक असल्याचा निष्कर्ष

न्यूजसेवा
लंडनः
उदासीनतेचा सामना करणार्या ब्रिटनमधल्या शाळेतल्या मुलांसाठी ध्यान वर्ग सुरू करण्यात आले.याला माइंडफुलनेस ट्रेनिंग म्हणतात. यामध्ये मुलांचं मन एकाग्र राहावं यासाठी खास वर्ग ठेवण्यात आले होते; परंतु ब्रिटनमधल्या सरकारने माइंडफुलनेस प्रशिक्षणाचे परिणाम तपासण्यासाठी संशोधन केलं तेव्हा आश्चर्यकारक परिणाम समोर आले. दहापैकी आठ मुलांना त्याचा कंटाळा आला.
मुलांच्या पालकांमध्ये चिंताग्रस्ततेचा विकार असेल, तर तो मुलांमध्ये हस्तांतरित होण्याची शक्यता जास्त असते.एखाद्या मुलामध्ये चिंताग्रस्ततेचा विकार विकसित होत असेल,तर आईपासून मुलीपर्यंत आणि वडिलांकडून मुलापर्यंत त्याचं स्वरूप वेगवेगळं असतं.या संशोधनानंतर अशा मुलींची चिंता आणखी वाढली आहे,ज्यांच्या माता चिंता विकाराने त्रस्त आहेत.दुसरीकडे,वडिलांना चिंता असूनही,मुलाला चिंता असण्याची शक्यता नाही,असंही आढळून आलं.
संशोधनात ब्रिटनमधल्या शंभरहून अधिक शाळांमधल्या २८ हजाराहून अधिक विद्यार्थी आणि ६५० शिक्षकांचा सहभाग होता.वर्गाचा फायदा शिक्षकांना झाला.प्रामुख्याने मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा मुलांपेक्षा शिक्षकांनाच फायदा झाल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. हे प्रशिक्षण शिक्षक घरी आणि शाळेत सतत घेतात. त्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं होतं. ब्रिटिश सायकोलॉजिकल सोसायटीचे डॉ.डॅन ओ’हारे म्हणतात की,” संशोधनातून समोर आलेल्या निकालांनुसार माइंडफुलनेस प्रशिक्षणाचं मॉडेल बदलणं आवश्यक आहे,जेणेकरून विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. ब्रिटनमधले एक चतुर्थांश लोक नैराश्याने ग्रस्त आहेत.एका संशोधनानुसार,ब्रिटनमधल्या लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक नैराश्याचे बळी आहेत. ब्रिटनमधल्या सुमारे ७० दशलक्ष लोकसंख्येसाठी राष्ट्रीय आरोग्य योजनेंतर्गत मानसिक आरोग्यासाठी विशेष बजेट देखील जारी केलं जातं. असं असूनही नैराश्याची समस्या तशीच आहे.
दरम्यान,कॅनडातल्या डलहौसी विद्यापीठातल्या मानसोपचार विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक पावलोव्हा यांच्या मते,संशोधनातून असं समोर आलं आहे की, मुलांच्या पालकांमध्ये चिंताग्रस्ततेचा विकार असेल, तर तो मुलांमध्ये हस्तांतरित होण्याची शक्यता जास्त असते.एखाद्या मुलामध्ये चिंताग्रस्ततेचा विकार विकसित होत असेल,तर आईपासून मुलीपर्यंत आणि वडिलांकडून मुलापर्यंत त्याचं स्वरूप वेगवेगळं असतं.या संशोधनानंतर अशा मुलींची चिंता आणखी वाढली आहे,ज्यांच्या माता चिंता विकाराने त्रस्त आहेत.दुसरीकडे,वडिलांना चिंता असूनही,मुलाला चिंता असण्याची शक्यता नाही,असंही आढळून आलं. आणखी एका संशोधनातून दिसून आलं की,’मुलं पालकांच्या वर्तनाचं अनुकरण करतात.अशा परिस्थितीत ते चिंताग्रस्त असताना पालकांप्रमाणेच वागणूक स्वीकारतात.दुसरीकडे,पालकांना चिंता असते,तेव्हा मुलांना चिंता जडण्याची शक्यता असते.