जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

शिक्षण हे समाज प्रबोधनाचे प्रमुख साधन-प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिक्षण हे समाज प्रबोधनाचे प्रमुख साधन असून जसजसे समाजात बदल होतात त्याचप्रमाणे शिक्षण व्यवस्थेत बदल घडत असल्याचे प्रतिपादन डॉ.अरुण चैनीत यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“नवीन शैक्षणिक धोरण हे भारताच्या पायाभरणीत महत्त्वाचे ठरेल असा आशावाद व्यक्त करतांनाच २१ व्या शतकाच्या शैक्षणिक आव्हानांना पूर्ण करण्याचे काम शिक्षकच करू शकतात”-संदीप रोहमारे,विश्वस्त कोपरगाव एज्युकेशन सोसायटी कोपरगाव.

कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याख्यानाचे आयोजन व प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून फरानखोत राजाभट विद्यापीठ,बँकॉक,थायलंड येथील डॉ. अरुण चैनीत व सीईओ,ओनिस्ट कन्सल्टींग ग्रुप कंपनी बँकॉक थायलंड चे तविचाय चारॉन शिलावत हे उपस्थित होते.त्यावेळी ते बोलत होते.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शिक्षण हे समाज प्रबोधनाचे प्रमुख साधन असून जसजसे समाजात बदल होतात त्याचप्रमाणे शिक्षण व्यवस्थेत बदल घडत असतात. जागतिक पातळीवर युनेस्कोने एकविसाव्या शतकाला ज्ञानाचे शतक संबोधले असून गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी एकविसाव्या शतकातील शिकविन्याची नवनवीन तन्त्रे वापरली पाहिजे.तसेच मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.तविचाय चारॉन शिलावत यांनी व्यव्स्थापनातील विविध तन्त्रे याविषयी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी आपल्या स्वागत मनोगतात नवीन शैक्षणिक धोरण २०२० यावर आपले विचार व्यक्त करतांनाच वर्तमान शिक्षणप्रणाली व रोजगार निर्मिती यावर भाष्य केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य संदीप रोहमारे यांनी नवीन शैक्षणिक धोरण हे भारताच्या पायाभरणीत महत्त्वाचे ठरेल असा आशावाद व्यक्त करतांनाच २१ व्या शतकाच्या शैक्षणिक आव्हानांना पूर्ण करण्याचे काम शिक्षकच करू शकतात असे नमूद केले.

अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.विजय ठाणगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.रवींद्र जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राध्यापक प्रबोधिनी कक्षाचे समन्वयक डॉ.आर.के.कोल्हे यांनी उपस्थितांचे आभार मानले तर प्रा.वर्षा आहेर यांनी सूत्रसंचलन केले.यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close