जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

चौपदरी रस्त्याचा १८७.८३ कोटींचा मंजूर निधी परत,जबाबदारी कोणाची ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरातील विविध कामांचे श्रेय घेण्याची स्पर्धा काळे-कोल्हे यांच्यात रंगली असताना उत्तर भारतीयांना पुणे आणि दक्षिण भारताला जोडण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या तळेगाव मार्गे कोपरगाव-संगमनेर रस्त्याच्या भाग असलेला झगडेफाटा ते वडगाव पान या ३३ कि.मी.रस्त्यासाठी आशियायी विकास बँकेचा सुमारे १८७.८३ कोटींचा निधी मंजूर होऊनही तो परत गेला आहे असल्याची माहिती,माहिती अधिकारात पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या हाती आली आहे.मग याचे श्रेय कोणाचे ? असा तिखट सवाल जवळके आणि रांजणगाव देशमुख आदी परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.

तळेगाव दिघे मार्गे झगडेफाटा ते वडगाव पान या रस्त्यासाठी नगर येथील सार्वजनींक बांधकाम विभागाचे मंडळ अभियंता जे.डी.कुलकर्णी यांनी दि.२५ सप्टेंबर २०२० रोजी पाहणी दौरा करून ३३ कि.मी.रस्त्यासाठी १८७.८३ कोटी रुपयांचा अहवाल तयार करून प्रकल्प संचालक आशियायी बँक सहाय्यित प्रकल्प तथा मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण मुंबई यांना पाठवला होता.याबाबत आमचे प्रतिनिधी नानासाहेब जवरे यांच्या हाती नुकतीच माहिती अधिकारात धक्कादायक माहिती जा.क्रं.२८८/२०२३ दि.२२/०२/२०२३ अन्वये हाती आली आहे त्यामुळे याभागातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”आशिया व अतिपूर्वेकडील देशांच्या आयोगाने (इकॅफे) पुरस्कारिलेली ही बँक डिसेंबर १९६६ मध्ये कार्यान्वित झाली.इकॅफे प्रदेशामधील व बाहेरील मिळून ४४ देश व प्रदेश या बॅंकेचे सदस्य आहेत (३० एप्रिल १९७४).या देशांतील खाजगी व सरकारी भांडवलगुंतवणुकीस प्रोत्साहन देणे,त्यांच्या विदेश व्यापाराची,विशेषतः आंतरप्रदेशीय व्यापाराची,वाढ व्हावी म्हणून आर्थिक व तांत्रिक साहाय्य पुरविणे,कृषिउद्योग आणि सार्वजनिक प्रशासन विषयक राष्ट्रीय वा प्रदेशीय पातळीवर कार्य करीत असलेल्या संस्थांच्या वाढीसाठी किंवा पायाभूत सुविधा निर्मिती,नवीन संस्थांच्या स्थापनेसाठी तांत्रिक साहाय्य देणे आणि सदस्य-देशांतील साधनसामग्रीचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून आर्थिक विकासास हातभार लावणे ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बँकेची स्थापना झाली.सदर बँकेने राज्याचा ३० टक्के हिस्सा व या बँकेचा ७० टक्के निधी देण्याच्या बोलीवर तळेगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील झगडेफाटा ते संगमनेर तालुक्यातील वडगाव पान फाटा या ३३.१५६ कि.मी.रस्त्यासाठी सुमारे १८७.८३ कोटी रुपयांचा निधी सन-२०१८ साली मंजूर केला होता.यात आशियायी विकास बँकेने या रस्त्यासाठी राज्याचा ३० टक्के हिस्सा व या बँकेचा ७० टक्के निधी देण्याच्या बोलीवर राज्य मार्ग क्रमांक ६५ कि.मी.६९ ते कि.मी.१०३.२०० या तळेगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील झगडेफाटा ते वडगाव पान फाटा या ३३.१५६ कि.मी.रस्त्यासाठी सुमारे १८७.८३ कोटी रुपयांचा निधी (म्हणजेच प्रति कि.मी.५.६७ कोटी रुपये आर्थिक तरतूद ) सन-२०१८ साली मंजूर केला होता.त्यासाठी राज्याचा हिस्सा ३० टक्क्याने ५६.३४० कोटी तर आशियायी विकास बँकेचा हिस्सा ७० टक्क्याने १३१.४८१ कोटी येत होता.मात्र याकडे कोपरगाव आणि संगमनेर तालुक्यातील राजकीय शुक्राचार्यांनीं नेहमी प्रमाणे दुष्काळी भागाबाबत आकस दाखवून सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.त्यासाठी नगर येथील सार्वजनींक बांधकाम विभागाचे मंडळ अभियंता जे.डी.कुलकर्णी यांनी दि.२५ सप्टेंबर २०२० रोजी पाहणी दौरा करून अहवाल तयार करून प्रकल्प संचालक आशियायी बँक सहाय्यित प्रकल्प तथा मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण मुंबई यांना पाठवला होता.याबाबत आमचे प्रतिनिधींच्या नुकतीच माहिती अधिकारात धक्कादायक माहिती जा.क्रं.२८८/२०२३ दि.२२/०२/२०२३ अन्वये हाती आली आहे.

सदर माहितीत अहवाल तयार करण्यासाठी राज्य शासनाने पुणे येथील आर्किटेक्नो कन्सल्टंट इंडिया प्रा.ली.चेतक इंजिनिअर्स पुणे यांची नियुक्ती केली होती.त्यांनी या मंजुरीत कायम खराब होणारा सखल भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरण व अनेक ओढे,नाले,आणि रस्त्यावर मोठे पूल,प्रत्येक गावात चार पदरी रुंद रस्ता आदीं कामांचा समावेश होता.सदर रस्त्याची रुंदी सिन्नर शिर्डी रस्त्याच्या रुंदी इतकी ऐसपैस होती.यात सतरा साखळी क्रमांकात हायड्रोलीक कॅल्क्युलेशनची तपासणी करून नवीन पाईप मोऱ्या समाविष्ट करण्यात आल्या होत्या.

यातील साखळी क्रं.८०.९७० मधील पुलाच्या बाजूस रेटिंग वालचे बांधकाम प्रस्तावित होते.शिवाय संगमनेर तालुक्यातील मौजे तळेगाव दिघे हद्दीत १० कि.मी.डांबरीकरणा ऐवजी चौपदरी काँक्रिटीकरण रस्त्याचे संकल्पन व गावातील राष्ट्रीय मार्ग १६० डी व राज्य मार्ग ६५ यांच्या संगमस्थान सुधारणा काँक्रिटीकरण कामाचा समावेश होता.

दरम्यान मौजे रांजणगाव देशमुख साखळी क्रं.८७/७०० ते ८८/१५० मौजे जवळके साखळी क्रं.९२/६०० ते ९३/२०० मध्ये रस्त्याचे चौपदरीकरण प्रस्तावित करण्यात आले होते.

दरम्यान यात साखळी क्रं.८८/१४६ मधील अस्तित्वातील उंची कमी करणेसाठीचा काटछेद वापरण्याचे आदेश होते.
याशिवाय साखळी क्रं.९०/३०० ते ९०/९०० मधील उच्च दाबाची विद्युत वाहिनीचा विचार करून रस्त्याची लेव्हल घेऊन काम प्रस्तावित केले होते.
मौजे पोहेगावात कि.मी.९७/२४० ते ९९/१०० मध्ये काटछेदात रास्त्याचे चौपदरीकरण प्रस्तावित करण्यात आले होते.मौजे पोहेगाव शिवारात साखळी क्रं.९८/८१० मधील छोट्या पुलाची निर्मिती प्रस्तावित होती.

दरम्यान साखळी क्रं.९८/०५० ते १००/५०० मध्ये लोअरिंग द प्रपोज्ड एफ.आर.एल.प्रस्तावित होता.साखळी क्रं.१००/४५० मध्ये पोहेगाव हद्दीतील मयुरेश्वर मंदिराजवळ उपलब्ध असलेल्या रुंदीचे मोजमाप करून प्रस्तावित केलेला काटछेद तपासण्याचे आदेश होते.साखळी क्रं.६९/००ते ८६/७००मधील सी.आर.बी.ची पुनश्च चाचणी करून आलेले निष्कर्ष कार्यकारी अभियंता संगमनेर यांचेकडून तपासण्याचे व काटछेद प्रस्तावित करण्याचे आदेश होते.त्यामुळे तळेगाव दिघे,जवळके,रांजणगाव देशमुख,पोहेगाव आदी ठिकाणी हे काटछेद होऊन प्रशस्त रस्ते होऊन अपघात कमी होणार होते.मात्र त्याकडे सोयींस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले आहे.असून वर्तमानात आधी झगडे फाटा ते जवळके पर्यंत दहा कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.तर जवळके ते संगमनेर हद्द भागवतवाडी पर्यंत रस्त्यावर मुरूम टाकून त्यावर डांबरीकरण करण्याचे कामासाठी आणखी पाच कोटी अशा पंधरा कोटी रुपयांच्या आरत्या ओवळण्याचे काम आ.आशुतोष काळे समर्थकांकडून सुरु आहे.तथापि या रस्त्यासाठी हा मोठी निधी मिळणार असल्याने अन्य निधीची तरतूद करू नये असे आदेश बांधकाम विभाग मुख्य अभियंता नाशिक यांनी दि.२४ डिसेंबर २०१८ रोजी अधीक्षक अभियंता अ.नगर यांना काढले होते.त्यामुळे या रस्त्याला तब्बल ५ वर्ष कोणतीही आर्थिक तरतूद झाली नव्हती त्यामुळे या रस्त्यावर चालणे कठीण बनले होते.त्यामुळे धुळे,मालेगाव आदी कडून येणारी अवजड वहाने आणि प्रवाशांना पर्यायी शिर्डी बाह्यवळण रस्त्यामार्गे-काकडी (शिर्डी ) विमानतळ मार्गाचा वापर करावा लागत होता.त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होत होता व तळेगाव मार्गे अपघातात मोठी वाढ झाली होती त्यात अनेकांना आपले जीवित व वित्तीय हानीं सोसावी लागली ती वेगळीच.

या रस्त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी अपघात कमी होण्यास मदत मिळणार होती.मात्र संगमनेर,राहाता आदी तालुक्यात मुख्यमंत्री पदाचे दावेदार केवळ पोकळ दावे सांगणारे असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्याना शेजारच्या तालुक्यातील माजी मंत्री छगन भुजबळ,सिन्नर,वैजापूर तालुक्यातील नेते भारी पडले असल्याचे दिसून आले आहे.सदरचा १८७.८३ निधी परत गेल्याने सगळे मुसळ केरात गेले आहे.या आधीच निळवंडे धरणाचे काम आपल्या मद्य कारखान्यासाठी या मंडळींनी होऊ दिले नाही त्या नंतर हा रस्त्याचा अन्याय हा सहनशीलतेच्या पलिकडे गेला होता.

त्यामुळे पोहेगाव,शहापूर,बहादराबाद,जवळके,धोंडेवाडी,बहादरपूर,अंजनापूर,रांजणगाव देशमुख,काकडी,डांगेवाडी,मनेगाव,चिंचोली,वेस-सोयगाव आदी गावातील ग्रामस्थानीं तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे.व सदर निधी पुन्हा एकदा पाठपुरावा करून परत आणावा अशी मागणी जनमंगल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव थोरात,गंगाधर रहाणे,बाळासाहेब चि.रहाणे,माजी सरपंच वसंत थोरात,बंडोपंत थोरात,उपसरपंच रामनाथ पाडेकर,नामदेव थोरात,डी.के.थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,दत्तात्रय थोरात,रावसाहेब थोरात,कौसर सय्यद,बाबासाहेब गव्हाणे,कैलास गव्हाणे,नरहरी पाचोरे,भाऊसाहेब गव्हाणे,प्रकाश थोरात,बंडोपंत देशमुख,संजय गुंजाळ,नामदेव दिघे,पाटीलभाऊ दिघे आदीं आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close