दळणवळण
कोपरगाव मतदार संघातील…या रस्त्यासाठी ९.६३ कोटीची प्रशासकीय मान्यता

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा गावाला जोडणाऱ्या पुणतांबा-न.पा.वाडी या साडे पाच किलोमीटर व संभाजीनगर ते वाकडी या दोन्ही रस्त्यांसाठी ९.६३ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
पुणतांबा-नपावाडी ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी आ.काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून पुणतांबा-नपावाडी या साडे पाच किलोमीटर रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा २ योजना (सर्वसाधारण) (डीपीसी) अंतर्गत ५.२० कोटी व संभाजीनगर ते वाकडी या रस्त्यासाठी ४.४३ कोटी असा एकूण ९.६३ कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या राहाता तालुक्यातील ११ गावांच्या रस्त्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते.या अकरा गावातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होवून नागरिकांना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नव्हते.त्यामुळे ग्रामस्थ नाराज होते.त्यामुळे अपघात मोठया प्रमाणात होत होते.त्याबाबत ग्रामस्थानीं अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या.मात्र कोणीही त्या कडे लक्ष देत नव्हते.परिणामी मोठी बाजारपेठ असलेल्या पुणतांबा गावाच्या बाजारपेठेची आर्थिक उलाढाल मंदावली होती.त्याकडे ग्रामस्थानीं आ.काळे यांचे लक्ष वेधून घेतले होते.
त्यामुळे पुणतांबा-नपावाडी ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून पुणतांबा-नपावाडी या साडे पाच किलोमीटर रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा २ योजना (सर्वसाधारण) (डीपीसी) अंतर्गत ५.२० कोटी व संभाजीनगर ते वाकडी या रस्त्यासाठी ४.४३ कोटी असा एकूण ९.६३ कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होवून या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचा दावा केला आहे.त्याबाबत ग्रामस्थानीं समाधान व्यक्त केले आहे.