दळणवळण
…या मतदार संघातील रस्त्यांसाठी २३.२७ कोटीची प्रशासकीय मान्यता

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रलंबित असलेल्या वारी-कान्हेगाव ते संवत्सर रस्ता,प्र.जि.मा.८४ ते पोहेगाव-देर्डे चांदवड ते कुंभारी रस्ता व ओगदी ते पढेगाव या महत्वाच्या एकूण २५ किलोमीटर रस्त्यांसाठी २३.२७ कोटीची प्रशाकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
आ.आशुतोष काळे यांच्या पाठ्पुराव्यातून वारी-कान्हेगाव ते संवत्सर रस्ता (१०.७४ कोटी),प्र.जि.मा.८४ ते पोहेगाव-देर्डे चांदवड ते कुंभारी रस्ता (७.८१ कोटी) व ओगदी ते पढेगाव (४.७२ कोटी) या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या एकूण २५ किलोमीटर रस्त्यांसाठी २३.२७ कोटीची प्रशाकीय मान्यता मिळाली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्त्यांची वाट लागली आहे.त्या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचं आहे.मात्र म्हणावा असा निधी मिळत नाही व तालुक्यातील रस्ते मात्र सुरळीत होत नाही हि तालुक्याची शोकांतिका आहे.मात्र याबाबत आ.काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या रस्त्यांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी होते त्यासाठी लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळवून या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच होता.त्या पाठ्पुराव्यातून वारी-कान्हेगाव ते संवत्सर रस्ता (१०.७४ कोटी),प्र.जि.मा.८४ ते पोहेगाव-देर्डे चांदवड ते कुंभारी रस्ता (७.८१ कोटी) व ओगदी ते पढेगाव (४.७२ कोटी) या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या एकूण २५ किलोमीटर रस्त्यांसाठी २३.२७ कोटीची प्रशाकीय मान्यता मिळाली आहे.
दरम्यान लवकरच या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरु होवून कामाच्या निविदा देखील प्रसिद्ध होतील व रस्त्याचे कामास प्रारंभ होणार आहे.सबंधित गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.