जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

निळवंडे कालव्याचे खोटे जलपूजन व वाढदिवस जनतेला माहित-माजी खा.वाकचौरे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या व गेली ५३ वर्ष प्रलंबित असलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यासांठी कवडीचे योगदान नसणारी मंडळी आज निळवंडे कालव्याचे खोटे जलपूजन व खोटे वाढदिवस साजरे करत असून उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याबाबत वस्तुस्थिती माहिती असून ते या भूलथापांना बळी पडणार नाही आगामी निवडणुकीत ते तोंडघशी पडणार असल्याचे प्रतिपादन खा.लोखंडे यांचे नाव घेता शिर्डी लोकसभा मतदार संघाचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे आणि जवळके येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे यांनी नुकताच श्रीरामपूर येथे,’न भूतो’ असा (वस्तुस्थिती नसलेला) वाढदिवस साजरा केला आहे.तर दुसरीकडे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी काहीं महिन्यांपूर्वी शिवसेना या मातृपक्षात प्रवेश करून उबाठा सेनेकडून आपली उमेदवारी निश्चित केली आहे.त्यामुळे अस्वस्थ व नाराज माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेने कडून पुन्हा एकदा आपले नशीब चाचपण्यास सुरुवात केली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

  

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र हे सर्वात महत्त्वाचं राज्य मानले जात आहे.देशात लोकसभेच्या सर्वाधिक मतदारसंघ हे उत्तर प्रदेशमध्ये आहेत.त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.महाराष्ट्रात एकूण ४८ मतदारसंघ आहेत.आगामी लोकसभा निवडणुकांची पूर्व तयारी राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. तसेच राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण एक जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर करण्याचा कार्यक्रम सुरू आहे.आगामी लोकसभा निवडणुका-२०२४ मध्ये होणार असून त्या दृष्टीने राज्यातील मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे.या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने राज्याचा दौरा केला.या पार्श्वभूमीवर शिर्डीसह राज्यातील लोकसभा निवडणुकांची विविध पक्षाची जोरदार बांधणी सुरु आहे.शिर्डीची त्याला अपवाद नाही.शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे यांनी नुकताच श्रीरामपूर येथे,’न भूतो’ असा (वस्तुस्थिती नसलेला) वाढदिवस साजरा केला आहे.तर दुसरीकडे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी काहीं महिन्यांपूर्वी शिवसेना या मातृपक्षात प्रवेश करून उबाठा सेनेकडून आपली उमेदवारी निश्चित केली आहे.त्यामुळे अस्वस्थ व नाराज माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेने कडून पुन्हा एकदा आपले नशीब चाचपण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खा.सदाशिव लोखंडे पुन्हा एकदा अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे मतदार संघात कधी न दिसणारे खा.लोखंडे मतदार संघात अवतीर्ण झाले असून मतदार संघात पायाला भिंगरी लावून पळताना दिसत आहे.मात्र त्या आधी माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नेमकी संधी साधत शिवसेनेत प्रवेश करून खा.लोखंडे यांना आव्हान निर्माण केले असल्याचे मानले जात आहे.

आज पर्यंत आलेले सर्व अहवाल त्यांना प्रतिकूल तर माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना अनुकूल आढळून आले आहे.त्याची दखल मातोश्रीने घेऊन माजी मंत्री बबनराव घोलप नाराज असताना त्यांना पायघड्या अंथरल्या असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे आज तरी माजी खा.वाकचौरे हे आज प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पासून दुष्काळी व निळवंडे लाभक्षेत्रातील गावात दौरा करण्यात प्रारंभ केला आहे.त्याची सुरुवात त्यांनी कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायती पासून केली असून तेथील नव्याने निवडून आलेल्या पदाधिकारी आणि सदस्य आदींचे सत्कार करून केली असल्याचे मानले जात आहे.त्यांनी आज जवळके,बहादरपूर,अंजनापूर,रांजणगाव देशमुख,तळेगाव दिघे,नान्नज दुमाला आदी ठिकाणी आज भेटी देऊन आपला दौरा संपन्न केला आहे.त्यावेळी ते बोलत होते.

“निळवंडे प्रकल्प ज्यांना माहिती नव्हता त्या लोकप्रतिनिधींना आता लोकसभा निवडणूक जवळ आल्याने तो आठवू लागला आहे.एरवी ते मतदार संघात कधी दिसत नाहीत.त्यांच्या वर्तमान पत्रात हरवले असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताना दिसतात.मात्र त्यांना आता पश्चिमेचे पाणी पूर्वेस वळविण्याचे स्वप्न पडू लागले आहे”-माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा.

  

सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,सचिव कैलास गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,सुखदेव थोरात,महेंद्र सोनवणे,जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात,हिराबाई थोरात,जालिंदर थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात,गोरक्षनाथ थोरात,सदस्य भाऊसाहेब थोरात,मीना विठ्ठल थोरात,वनिता रखमा थोरात,गोरक्षनाथ वाकचौरे,इंदूबाई नवनाथ शिंदे,दत्तात्रय थोरात,चंद्रकांत थोरात,अरुण थोरात,नानासाहेब थोरात,गोरक्षनाथ थोरात,जनमंगल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव थोरात,विजय शिंदे,जयराम वाकचौरे,सोपान थोरात,दत्तात्रय वाकचौरे,बबन थोरात,संतोष थोरात,साईनाथ थोरात,भीमराज चत्तर आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

    सदर प्रसंगी बोलताना ते म्हणाले की,”निळवंडे प्रकल्प ज्यांना माहिती नव्हता त्या लोकप्रतिनिधींना आता लोकसभा निवडणूक जवळ आल्याने तो आठवू लागला आहे.एरवी ते मतदार संघात कधी दिसत नाहीत.त्यांच्या वर्तमान पत्रात हरवले असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताना दिसतात.मात्र त्यांना आता पश्चिमेचे पाणी पूर्वेस वळविण्याचे स्वप्न पडू लागले आहे.मात्र दहा वर्ष त्यांनी मतदार संघात काय दिवे लावले आहे ते जनतेला माहिती आहे.आपण आपल्या काळात सर्व मतदार संघात निधी दिला होता.व आपले मानधनही विविध ट्रस्ट व देवस्थानांना दिले असल्याची आठवण करून दिली आहे.त्यावेळी त्यांनी आपण निळवंडे धरणाच्या प्रकल्पास १७ पैकी १४ चौदा मान्यता काँग्रेस राजवटीत मिळवून दिल्या असल्याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली आहे.अनेक मंदिरांना आपण ‘क’ व ‘ड’ तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळवून दिला असून अनेक मंदिरांच्या सभामंडपांना निधी मिळवून दिला होता.मात्र वर्तमान खासदार सापडून कोणाला सापडत नसल्याची कोपरखिळी त्यांनी मारत आगामी काळात आपण सेनेशी निष्ठावान राहणार असल्याचे सुतोवाच शेवटी केले आहे.

   सदर प्रसंगी प्रास्तविक सुखदेव थोरात यांनी केले तर पत्रकार नानासाहेब जवरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.तर उपस्थितांचे आभार सरपंच सारिका विजय थोरात यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close