जाहिरात-9423439946
दळणवळण

गावापासून शहरापर्यंत रस्ते बाजारपेठेला चालना देतात-आ.काळे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

वाडी-वस्तीपासून गाव आणि गावापासून शहरापर्यंत रस्ते असल्यास बाजारपेठेला चालना मिळण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोकमठाण येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे गो-शाळा स्थापन झाल्यापासून आजपर्यंत गो-शाळेला निधी मिळालेला नव्हता मात्र जैन समाजाच्या मागणीला तातडीने होकार देत कोकमठाण गो-शाळेच्या सभागृहासाठी आ.आशुतोष काळे यांनी १० लक्ष निधी दिला आहे हि समाधानाची बाब आहे”-आनंद दगडे,अध्यक्ष,गोकुळ धाम,कोकमठाण,ता.कोपरगाव.

कोकमठाण येथे विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर १० लक्ष निधीतून बहुउद्देशीय सभागृह बांधणे (गो-शाळा) व मंजूर घरकुलांचा भूमिपूजन समारंभ तसेच ४० लक्ष निधीतून कोकमठाण-माळवाडी ते प्रजिमा ०८ डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन व जिकल फिटनेस रिक्रिएशन संकल्पनेवर आधारित क्रीडा साहित्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप अजमेरे होते.

सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर करखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,संचालक सुधाकर रोहोम, सुरेश जाधव,दिलीप अजमेरे,पीपल्स बँकेचे अध्यक्ष कैलास ठोळे,माजी नगरसेवक अतुल काले,माजी नगरसेवक मंदार पहाडे,सरपंच उषाताई दुशिंग,उपसरपंच अरविंद रक्ताटे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे संचालक सुदाम लोंढे, विजय रक्ताटे,विजय पंढरीनाथ रक्ताटे,विजय थोरात,दादासाहेब साबळे,प्रकाश देशमुख, सुनील कुहिले, ग्रामसेवक संग्राम बोर्डे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”गाव,तालुका व शहराचा विकास साधायचा असेल तर दर्जेदार रस्ते असणे अत्यंत आवश्यक असून त्याशिवाय विकास साधने शक्य नाही.रस्त्यांची सुविधा असल्यास दळणवळणाच्या अडचणी येत नाही.शेतकरी,दुध व्यवसायिक यांचे साधने वाडी वस्तीपासून गाव व शहरापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे वाडी वस्तीपासून गावा पर्यंत व गावापासून शहरापर्यंत रस्ते असल्यास बाजारपेठेला चालना मिळण्यास मदत होते व गावचा,शहराचा विकास होवू शकतो.विस्तीर्ण परिसर असलेल्या कोकमठाणमध्ये देखील रस्त्यांचे जाळे निर्माण होणे हि काळाची गरज असून परिसरातील वाड्या वस्त्यांसह सर्वच रस्त्यांचा विकास होण्यासाठी रस्त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे.त्यामुळे कोकमठाणसह मतदार संघात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर देत असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close