जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

एका रात्रीत तीन कारची चोरी,कोपरगाव पोलीस बनले मूक साक्षीदार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात चार चाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले असून राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा चोरट्यांवर धाक राहिलेला दिसत नाही त्यामुळे कोपरगाव शहरात काल रात्री पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यानी सहयाद्री कॉलनी साईनगर आणि निवारा परिसरातून विविध तीन कार चोरून नेल्याने शहरात वहान चालकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

दरम्यान कोपरगाव शहरात अनेक अल्पवयीन मुली गायब होत असून त्यांचा शोध लागताना दिसत नाही.शहर पोलीस आपल्या ठाण्यात गुन्हे दाखल कसे होणार नाही व परस्पर कसे मिटतील याची दखल घेताना दिसत असून दाखल झालेले गुन्हे पत्रकारांपर्यंत कसे पोहचणार नाही याची खबरदारी घेताना दिसत आहे.व जे पत्रकार वस्तुस्थिती दर्शक बातम्या देतात त्यांना कायदेशीर अडकविण्यासाठी काही विघ्नसंतोषी वकिलांना हाताशी धरून आपले इप्सित साध्य करताना दिसत असल्याचे दुर्दैवी चित्र शहरात दिसत आहेत तर लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते,नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मुकदर्शक बनले आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात दुचाकी चोरांचा सुकाळ झाला असून अनेकांच्या दुकाची,चार चाकी वहाने चोरीस गेल्याचे अनेक गुन्हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत व होत आहेत.गत सप्ताहात तालुका पोलिसांनी ट्रॅक्टर चोरीची संगमनेर तालुक्यातील एक टोळी पकडली असून त्यांच्याकडून चार ट्रॅक्टर हस्तगत केले आहे.मात्र कोपरगाव शहर पोलिसांचे मात्र नेमके उलटे सूत्र दिसत असून चोरी झालेली वहाने जप्त झाल्याची घटना दुर्मिळ मानली पाहिजे.वर्तमानात म्हणजेच काल.दि.२२ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास नागरीक सामसूम झाल्यावर चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसर,सह्याद्री कॉलनी,आणि साईनगर परिसरातून तब्बल एक नव्हे दोन नव्हे तर तीन कार चोरून पोलिसांना नाक खाजवून दाखवले आहे.त्यामुळे वहान धारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यात पहिला गुन्हा हा डॉ.जगदीश लक्ष्मीनारायण झंवर (वय-६०) रा.बालाजी संकुल सुभद्रानगर यांनी दाखल केला आहे.त्यात त्यांनी म्हटलं आहे की,”आपण आपल्या वरील ठिकाणी आपली पांढऱ्या रंगाची मारुती एर्टीगा क्रं.एम.एच.१७ बी.व्ही.८४४०) इंजिन क्रं.डि.१३ ए.-५६८२६३९) हि ०७ लाख रुपये किमतीची गाडी घरासमोर कुलूप लावून उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यानी ती लबाडीच्या इराद्याने सेंटर लॉक तोडून चोरून नेली आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.८२/२०२३ भा..द.वि.कलम ३७९ अन्वये दाखल केला आहे.

दरम्यान दुसरा गुन्हा हा लेखा परीक्षक असलेले दत्तात्रय बाळाजी खेमनर (वय-५७)रा.सह्याद्री कॉलनी यांची मारुती स्विफ्ट डिझायर हि १ लाख ४० हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची कार (क्रं.इमेज.१७ ए.जे.७७२५) हि
गाडी घरासमोर कुलूप लावून उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यानी ती लबाडीच्या इराद्याने सेंटर लॉक तोडून लंपास केली आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.८३/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये दाखल केला आहे.

दरम्यान तिसरा गुन्हा हा कोपरगाव न्यायालयात वकिली करत असलेले कनिष्ठ वकील मनोज कडू (वय-३६)रा.साईनगर यांचा असून त्यांची मारुती एर्टीगा (क्रं.एम.एच.१७ बी.व्ही.०४३६) हि ०५ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची कार (क्रं.इमेज.१७ ए.जे.७७२५) हि त्यांनी आपल्या घरासमोर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी ती सेंटर लॉक तोडून रातोरात चोरीच्या इराद्याने पळवून नेली आहे.त्यामुळे या वाहन चोरीत रातोरात चोरट्यांनी सुमारे १३ लाख ४० हजारांचा ऐवज लंपास केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात चोरट्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे.पोलिसांना मात्र हातावर होतच चोळत बसावे लागले आहे.कोपरगाव शहरत पोलिसांची गस्त सुरु असताना चोऱ्या कशा होतात हा संशोधनाचा विषय ठरला असून बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना राजकीय नेत्यांचे अभय असल्यानेच या चोऱ्या वाढल्या असल्याचे नागरिक आता खुलेआम चर्चा करू लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close