दळणवळण
वाट लागलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करा-कोपरगाव तालुक्यातील…या लोकप्रतिनिधींच्या सूचना
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश रस्त्यांचे व पुलांचे नुकसान झाले आहे.या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता सुनील वर्पे यांना नुकत्याच दिल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून या पावसाने ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली आहे.कोपरगाव मतदार संघ याला अपवाद नाही.त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे.त्यामुळे नागरिकांना अनेक अपघाताचा सामना करावा लागला आहे.अवजड वाहतूक दारांचे कंबरडे मोडले आहे.प्रवाशांचा मोठया प्रमाणावर इंधन व्यय होत आहे.आता पावसाने माघार घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला उसंत मिळाली आहे त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी या सूचना दिल्या आहेत.
गत तीन वर्षात पावसाची राज्यासह कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून या पावसाने ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली आहे.कोपरगाव मतदार संघ याला अपवाद नाही.त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे.त्यामुळे नागरिकांना अनेक अपघाताचा सामना करावा लागला आहे.अवजड वाहतूक दारांचे कंबरडे मोडले आहे.प्रवाशांचा मोठया प्रमाणावर इंधन व्यय होत आहे.आता पावसाने माघार घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला उसंत मिळाली आहे.त्यामुळे आता त्यांनी आपली हत्यारे बाहेर काढली असून रस्ते दुरुस्तीस प्रारंभ केला आहे.त्यामुळे अत्यंत नादुरुस्त रस्त्यांची कामे तातडीने करावी असे आदेश आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच कोपरगाव येथील सार्वजनिक बांधकाम उप विभागाला दिले आहे.
दरम्यान यात येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील एम.एम.के.आय.पी.एल.टोल नाका प्रशासनाने टोलनाका अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर देखील पावसामुळे अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडले असून या रस्त्याची टोलनाका प्रशासनाने दुरुस्ती करावी.ओव्हर-ले,डिव्हायडर कलर, थर्मप्लास्टचे पट्टे,गतिरोधक,डिव्हायडर क्लिनिंग व साईड पट्टी आदी कामे लवकरात लवकर पूर्ण करून वाहनचालकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वरील कामे पूर्ण करावी अशा सूचना एम.एम.के.आय.पी.एल.टोल नाका प्रशासनाला आ.आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.
त्यानुसार आता सार्वजनिक बांधकाम उपविभाग काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.