दळणवळण
बेलापूर-परळी रेल्वे मार्गाला आर्थिक तरतूद करा-माजी खा.वाकचौरे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
बेलापूर-परळी रेल्वे मार्गाला केंद्रीय मंजुरी देऊन तातडीने निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी शिर्डी लोकसभेचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे,नेवाशाचे माजी आ.बाळासाहेब मुरकुटे, व बेलापूर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे नुकतीच केली आहे
“बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे व माजी आ.मुरकुटे आदी २०१४ या त्यांच्या कार्यकाळापासून प्रयत्न करीत आहे.यांच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळून बेलापूर परळीची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे दिसत आहे”-चंपालाल बोरा,जिल्हा कार्यकारणी सदस्य,भाजप.
याबाबत माहिती अशी की बेलापूर परळी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण डिसेंबर-२०१८ मध्ये पूर्ण झाले होते व तो अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला होता परंतु तांत्रिक अडचणीमुळे हा अहवाल पुन्हा मुंबई कार्यालयात आला ही माहिती मिळताच माजी खा.वाकचौरे,माजी आ. बाळासाहेब मुरकुटे व सेवा संस्थेने याचा पाठपुरावा केला यामुळे हा अहवाल पुन्हा जुन महिन्यात रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला ही माहिती मिळताच माजी खा.वाकचौरे,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे,सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी यांनी दहा ऑगस्ट रोजी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री व रेल्वे राज्य मंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
या रेल्वे मार्गमुळे जनतेचा व रेल्वेचा कसा फायदा होईल यावर मंत्र्यांचे लक्ष वेधले तसेच या रेल्वे मार्गाबाबत सविस्तर चर्चा केली आहे.
यावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव व राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी सकारात्मकता दाखवत या अहवालावर पुढील कार्यवाही करून लवकरच न्याय देण्यात येईल असे आश्वासित केले आहे.या भेटीमुळे या मार्गावरील जनतेत समाधानाचे वातावरण पसरले आहे.जनतेतून माजी खा.वाकचौरे,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे आदींचे कौतुक केले जात आहे.