दळणवळण
कोपरगाव तालुक्यात…येथे रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रवंदे धामोरी मळेगाव थडी या ठिकाणी आ.आशुतोष काळे यांच्या निधीतून ८२ लाखांचा रस्त्यांचे भूमिपूजन नुकतेच त्यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.
सदर प्रसंगी आ.काळेंच्या उपस्थितीत धामोरीच्या भाजप कार्यकर्त्यांनी राजेंद्र धुमाळ,संदीप माळी व किरण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.त्यांचे त्यांनी स्वागत केले.तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एम.पी.एस.परीक्षा उत्तीर्ण होवून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रुजू झालेल्या धामोरी येथील दिपक संजय मोरे यांचा सत्कार करण्यात आला आहे.
यामध्ये रवंदे येथे २० लक्ष रुपये निधीतून बाजीराव कदम घर ते प्रकाश शिरवाडे घर (तालुका हद्द) रस्ता डांबरीकरण करणे, मळेगाव थडी येथे ३२ लक्ष रुपये निधीतून प्रजिमा ४ गाडे वस्ती ते पंडित खोंड वस्ती रस्ता डांबरीकरण करणे व धामोरी येथे २० लक्ष रुपये निधीतून धामोरी वेस ते बाळासाहेब दरेकर शेती रस्ता,तसेच २० लक्ष निधीतून धामोरी वेस (ग्रा.मा. १)ते तालुका हद्द रस्ता मजबुतीकरण या रस्त्यांचे भूमिपूजन व १० लक्ष रुपये निधीतून संतोष गाडे घर ते उसरे वस्ती रस्ता खडीकरण कामाचे लोकार्पण श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.काळे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
सदर प्रसंगी माजी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानदेव मांजरे,सचिन चांदगुडे,अरुण चंद्रे,चंद्रशेखर कुलकर्णी,बाळासाहेब कदम,नारायण मांजरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,पंचायत समिती माजी उपसभापती अर्जुन काळे, अनिल कदम,माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,शांताराम सांगळे,सुदाम भुसे,विनोद घोटेकर,उत्तमराव भुसे,विनोद धुळे,कोंडीराम काळे,सागर कदम,जगन्नाथ कदम,रामदास कदम, तान्हाजी कदम, सर्जेराव घायतडकर, हिलाजी घायतडकर,कैलास घायतडकर,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,पंचायत समिती अभियंता लाटे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.