जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

परिवहन कार्यालयात खाजगी दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर (खाजगी) दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु
पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे परिवहनेतर (खाजगी) संवर्गातील दुचाकी एम.एच.१७ सी.टी. ही नवीन मालिका सुरु करण्यात आली आहे. आकर्षक व पसंतीचा क्रमांक मिळण्यासाठी पुढीलप्रमाणे पध्दत अवलंबण्यात येणार आहे.

एकाच पसंतीक्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आले तर त्या पसंती क्रमांकाची यादी १२ मे, रोजी ५.३० वाजता प्रदर्शित करण्यात येईल. पसंतीक्रमांकासाठी ज्यांनी अर्ज केला आहे अशा दुचाकी अर्जदारांनी १३ मे, रोजी दुपारी ४.०० वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनात हजर रहावे.

इच्छुक अर्जदारांनी १२मे, रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४-३० वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्टसह अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभाग खिडकी क्रमांक १५ येथे जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांचा पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड,(फोटो आयडी- भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेलसह) साक्षांकित जोडावा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, श्रीरामपूर (Dy.RTO,Shriramapur) या नावाने पसंती क्रमांक शुल्काचा डिमांड ड्राफ्ट कोणत्याही राष्ट्रीयकृत अथवा शेडुल्ड बँकेचा असावा. एकदा राखून ठेवलेला पसंती क्रमांक दुसऱ्या व्यक्तीच्या अथवा संस्थेच्या नावाने हस्तांतरीत करण्यात येणार नाही तसेच रद्द करता येणार नाही.
एकाच पसंतीक्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आले तर त्या पसंती क्रमांकाची यादी १२ मे, रोजी ५.३० वाजता प्रदर्शित करण्यात येईल. पसंतीक्रमांकासाठी ज्यांनी अर्ज केला आहे अशा दुचाकी अर्जदारांनी १३ मे, रोजी दुपारी ४.०० वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनात हजर रहावे.
चार चाकी ‍परिवहनेतर (खाजगी) वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी परिवहनेतर चार चाकी वाहन मालिकेत असणाऱ्या शुल्काच्या तीन पट शुल्क भरुन सी.टी. या मालिकेतील आकर्षक क्रमांक आरक्षित करता येतील. सदर मालिकेतील एकाच क्रमांकासाठी दुचाकी वाहन व चार चाकी वाहन यांसाठी अर्ज प्राप्त झाल्यास, सदर क्रमांकासाठी दुचाकी अर्जदार (दुचाकी वाहनांसाठीचे शासकीय शुल्क अधिक लिलावासाठी प्राप्त झालेल्या अतिरिक्त धनादेशाची रक्कम ) व चार चाकी वाहन अर्जदार (चार चाकी वाहनांसाठीचे शासकीय शुल्क अतिरिक्त धनादेशाची रक्कम ) यापैकी ज्या अर्जदाराची एकूण रक्कम जास्त असेल अशा अर्जदारास तो क्रमांक देण्यात येईल.आकर्षक क्रमांकासाठी विहित केलेल्या शासकीय शुल्काबाबतची माहिती उपप्रादेशिक ‍ परिवहन कार्यालय, श्रीरामपूर येथे नोटीस बोर्डावर तसेच ‍खिडकी क्रमांक ३१ वर प्रदर्शि त करण्यात आलेली आहे. इच्छूकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी शेवटी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close