दळणवळण
धारणगाव येथे रस्ता भूमिपूजन संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी श्री. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणावर आणलेल्या निधीतून अनेक गावात रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून अनेक रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केला आहे.
धारणगाव येथे देखील २४ लक्ष रुपये निधीतून अण्णासाहेब वहाडणे घर ते मंगेश जिरे घर रस्ता खडीकरण करणे व ३० लक्ष रुपये निधीतून धारणगाव-ब्राह्मणगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे,सदस्य श्रावण आसने, सरपंच नानासाहेब चौधरी,उपसरपंच गोरक्षनाथ चौधरी,रावसाहेब चौधरी,गौतम बँकेचे संचालक साहेबलाल शेख,सोपानराव वहाडणे,नानासाहेब दवंगे,शिवाजी चौधरी,निखील जाधव, राजेंद्र जाधव, भिमाजी वाकचौरे, रामनाथ रणशूर,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,शाखा अभियंता लाटे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे गाढे,ग्रामसेविका श्रीमती आहिरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.