दळणवळण
कोपरगाव तालुक्यातील रस्त्यासाठी मोठा निधी मंजूर-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या सुरेगाव-कोळपेवाडी-धारणगाव या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ३ कोटी ९८ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व- पश्चिम भागाला जोडणाऱ्या या सुरेगाव-कोळपेवाडी-माहेगाव देशमुख-कुंभारी-धारणगाव या (प्रजीमा ८५) एकून साडे आठ किलोमीटरचे मजबुतीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ३ कोटी ९८ लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे-आ.आशुतोष काळे.
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील भागाला जोडणारा सुरेगाव- कोळपेवाडी-धारणगाव- मार्गे कोपरगावला जाण्यासाठी जवळचा व सोयीस्कर मार्ग असलेल्या या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते.या मार्गाच्या लगत व जवळपास असलेल्या सुरेगाव,कोळपेवाडी,कोळगाव थडी,कुंभारी,धारणगाव तसेच शहाजापूर,वेळापूर,आदी गावातील नागरिकांना कोपरगाव येथे जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग होतो.रस्त्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील अनके रस्त्यांचे प्रस्ताव शासनदरबारी सादर करून या रस्त्यांना निधी मिळविला आहे. या सर्व रस्त्यांबरोबरच तालुक्याच्या पूर्व- पश्चिम भागाला जोडणाऱ्या या सुरेगाव-कोळपेवाडी-माहेगाव देशमुख-कुंभारी-धारणगाव या (प्रजीमा ८५) एकून साडे आठ किलोमीटरचे मजबुतीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आ.काळे यांना यश मिळाले असून या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ३ कोटी ९८ लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
विकासासाठी दळणवळणाच्या सुविधेस अनन्यसाधारण महत्व आहे.रस्ते ह्या विकासाच्या धमन्या म्हटल्या जातात त्यामुळे मतदार संघाचा विकास साधायचा असल्यास नागरिकांना चांगले रस्ते उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.त्यासाठी आ.काळे यांचे प्रयत्न सुरु आहेत. रस्त्यांच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून ते मतदार संघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.