दळणवळण
वाकडी ते गणेशनगर बस सेवा सुरु,प्रवाशांनी केले स्वागत
जनशक्ती न्यूजसेवा
वाकडी-(प्रतिनिधी )
वाकडी गणेशनगर परिसरातून श्रीरामपूर कडे जाणारा प्रवाशी वर्ग मुबलक असताना बस उपलब्ध होत नसल्याने शालेय विध्यार्थी व इतर प्रवाशी वर्गाची होणारी अडचण लक्षात घेऊन वाकडी येथील शिवसेना प्रमुख मछिंद्र भवार यांनी पाठपुरावा करून बंद झालेली बस सेवा सुरु केल्याने विध्यार्थी व प्रवाशी वर्गाची गैरसोय दूर केली असून प्रवाशांनी याचे स्वागत केले आहे.
राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी व गणेशनगर या भागात श्रीरामपूर कडे शालेय शिक्षण घेणारे विध्यार्थी व विविध कामासाठी प्रवास करणारे प्रवाशी वर्ग संख्या बऱ्यापैकी असताना बस डेपो कडून प्रवाशी बस देण्यात कायम अडचणी निर्माण होतात वेळोवेळी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातुन आगार प्रमुख यांना भेटून निवेदन देऊन वाकडी भागात बस सुरु करणेसाठी मागणी करावी लागते.तर कित्येक वेळा आंदोलन देखील करण्यात आले आहे.असे असताना विध्यार्थी व इतर प्रवाशी वर्गाची नेहमीचीच होणारी अडचण लक्षात घेता वाकडी येथील शिवसेना प्रमुख मछिंद्र भवार यांनी श्रीरामपूर चे माजी आ.भाऊसाहेब कांबळे,शिवसेना शहर प्रमुख सचिन बडदे,हृदयसम्राट कामगार सेनेचे सोमनाथ गोरे यांना ही समस्या सांगितली व तात्काळ शहर प्रमुख सचिन बडदे यांनी श्रीरामपूर बस डेपो प्रमुख शिवदे यांच्याशी चर्चा करून वाकडी गणेशनगर साठी वाढीव बस सुरु करण्यासाठी निवेदन दिले.वाकडी येथील मछिंद्र भवार यांनी सुमारे पंधरा दिवस वाकडी साठी बस सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला.या बस साठी किती विध्यार्थी असतील ते पाहून ये जा करण्यासाठी वेळ व विध्यार्थ्यांचे पास इत्यादी बाबी पूर्तता करून बस ची कितपत आवश्यकता आहे हे निदर्शनास आणून दिले तेव्हा आगार प्रमुख शिवदे यांनी ही मागणी तात्काळ मान्य करून वाकडी गणेशनगर साठी सकाळी ०९ वाजता व सायंकाळी ५.३० वाजता बस सेवा सुरु केली मछिंद्र भवार यांच्या या सामाजिक कार्याबद्दल विध्यार्थी व प्रवासी वर्गातून कौतुक होत आहे.यावेळी माजी आ.भाऊसाहेब कांबळे,शिवसेना शहर प्रमुख सचिन बडदे,सोमनाथ गोरे,मछिंद्र भवार,वाकडीचे प्रथम लोकनियुक सरपंच डॉ संपतराव शेळके,गोरक्षनाथ कोते,राजेंद्र गोपीनाथ लहारे,व बहुसंख्य विध्यार्थी उपस्थित होते.