दळणवळण
अहो आश्चर्यम !…या रस्त्यासाठी निधी मिळाला हो…!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील अनेक अपघात आणि नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या झगडेफाटा ते तालुका हद्द या रस्त्यासाठी सुमारे 17 कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.यासह विविध रस्त्यांसाठी 25 कोटी रूपयांचा निधीची नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात तरतूद झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.त्यामुळे अनेक बळी घेणाऱ्या,”या रस्त्यासाठी निधी मिळाला हो…! असे म्हणण्याची वेळ या रस्त्यालगत रहिवासी असलेल्या ग्रामस्थांवर आली आहे.

दरम्यान झगडे फाटा ते वडगाव पान हा नाशिक-पुणे आणि मुंबई नागपूर या दोन (राज्याच्या ) राष्ट्रीय महामार्गाच्या मध्ये येत असल्याचे तो राष्ट्रीय महामार्गात वर्ग होणे गरजेचे आहे मात्र त्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही.त्यामुळे हे रस्त्यांचे काम झाले तरी त्यांची काही महिन्यात नव्हे तरी पुढील पावसाळ्यात नक्कीच वाट लागणार आहे.हे येथे नमूद करणे गरजेचे आहे.
कोपरगाव तालुक्यातील रस्त्यासह नगर मनमाड रस्ता हा मृत्यूची खाई बनला आहे.गेली पंचवीस वर्षापासून या मार्गाचे काम सुरू आहे.मात्र त्याचे काम पूर्ण होण्याचे काही नाव घेईना.याशिवाय आणखी एक झगडेफाटा ते वडगाव पान हा रस्ता असाच राजकीय नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे कुरण ठरले आहे.त्यामुळे तालुक्यात प्रवासाला सुरुवात केली की नेत्याना आणि अधिकाऱ्यांना प्रवासी शेलकी विशेषणे बहाल करताना दिसत आहे.मध्यंतरी तर एका पालकाने आपल्या मुलाचा अपघात झाल्याने त्याचेवर प्राथमिक उपचार करून तो पुन्हा भर रस्त्यात आला आणि त्याने मनसोक्त सार्वजनिक विभागाचे अधिकारी नेत्याना शिवीगाळ केल्याचे चित्र अनेकांनी पाहिले असेल.तरीही ज्यांनी सोडून दिली आहे.त्याबाबत माध्यमांनी लेखणी झिजवण्यात अर्थ नाही अशी स्थिती उद्भवली आहे.मात्र एवढ्यात एक समाधानाची बातमी समोर आली आहे.नुकत्याच संपन्न होत असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात कोपरगाव विभानसभा मतदार संघातील बऱ्याच रस्त्यांना निधीची तरतूद केली असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये जाहीर केले आहे.

दरम्यान या सर्व रस्त्यांना पूर्वी कधी आर्थिक तरतूद केली याची कोणी माहिती अधिकारात माहिती घेतली तर याला एक किंवा दोन तीन वर्ष झाली असतील असे चित्रे आहे.म्हणजेच रस्त्याचा दर्जा समर दर्जाचा आहे.आणि या तरतुदीने खरेच ही कामे पुन्हा ठिकठाक होतील असे म्हणणे धारिष्ठांचे ठरणार आहे.त्यासाठी नजीकच्या ग्रामस्थानी सजग राहून काम करून घेणे गरजेचे बनणार आहे.
त्यात ज्या रस्त्यांची व पुलाची अत्यंत दुरवस्था झाली असून राज्य शासनाने राममा २२२ तोलारखिंड-कोतुळ-सावरचोळ-संगमनेर तळेगाव-कोपरगाव-उक्कडगाव-वैजापूर रस्ता (रा.मा.६५) किमी ९०/५०० ते १०१/२५० (झगडे फाटा ते तालुका हद्द खराब रस्त्याची लांबी) मध्ये रस्ता सुधारणा करणे यासाठी १७ कोटी रुपये या महत्वाच्या रस्त्याचा समावेश आहे.याशिवाय भरवस फाटा-चास-देर्डे-चांदवड रस्ता किमी २४२/०५० (रामा-७) (पटेल वस्ती शाजापूर पूल) वर पुलाचे बांधकाम करण्यासाठी ८० लाख रुपये,धारणगांव कुंभारी माहेगांव देशमुख कोळपेवाडी ते रामा-७ (प्रजिमा-८५) किमी ०/००० ते ५/००० (मौजे कुंभारी ते कोळपेवाडी खराब रस्त्याची लांबी) मध्ये रस्ताची सुधारणा करण्यासाठी ४ कोटी २० लाख रुपयांचा,जेऊर कुंभारी सडे शिंगवे पुणतांबा रस्ता (रामा ३६) किमी १६/४०० मध्ये जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे (कातनाला) बांधकाम करणे यासाठी ३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद २०२६-२७ च्या अर्थ संकल्पात करण्यात आली आहे.
दरम्यान या सर्व रस्त्यांना पूर्वी कधी आर्थिक तरतूद केली याची कोणी माहिती अधिकारात माहिती घेतली तर याला एक किंवा दोन तीन वर्ष झाली असतील असे चित्रे आहे.म्हणजेच रस्त्याचा दर्जा समर दर्जाचा आहे.आणि या तरतुदीने खरेच ही कामे पुन्हा ठिकठाक होतील असे म्हणणे धारिष्ठांचे ठरणार आहे.त्यासाठी नजीकच्या ग्रामस्थानी सजग राहून काम करून घेणे गरजेचे बनणार आहे.अन्यथा पुन्हा ही रस्ते मृत्यूचे सापळे बनले तर नवल नको…!



