दळणवळण
…या तालुक्यातील रस्त्यांसाठी मोठा निधी !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर आणि पूर्व तालुक्यासाठी महत्वाचा असणारा कोपरगाव-वैजापूर (रा.मा.-६५) वरील श्री साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन या रोडची दुरवस्था दूर करण्यासाठी केंद्र सरकारने २० कोटी तर कोपरगाव तालुक्याच्या पूर्व संवत्सर-भोजडे-धोत्रे रस्ता (प्रजिमा-५) कोळ नदीवरील पुलासाठी ०७ कोटी निधी असा एकूण २७ कोटी निधी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत (सीआरएफ) मधून मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील उत्तर व दक्षिण भारतासाठी जोडणारा नगर-मनमाड हा रस्ता अद्याप पूर्ण झाला नाही त्यामुळे या मार्गावर वाहतूक तुंबून अनेक प्रवाशांचे बळी जात असून झगडेफाटा ते वडगाव पान हा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून त्याचे शुक्लकाष्ठ संपलेले नाही.त्यामुळे जनतेत मोठा संताप आहे.त्याबाबत अद्यापही एकही नेत्याकडून चांगली बातमी येत नाही हे मोठे दुर्दैव आहे.
कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांचा अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे.परिणामी त्यामुळे तालुक्यात अपघातांची संख्या वाढली असून अनेकांचे बळी जात आहे.वित्तीय हानी वेगळी असून त्यामुळे नागरिक,प्रवाशी हैराण झाले आहे.त्यातच एक समाधानाची बाब समोर आली असून कोपरगाव तालुक्याला मराठवाड्याशी जोडणाऱ्या वैजापूर रस्त्याची दुरावस्था दूर करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी 07 कोटींची मंजुरी दिली असून या व्यतिरिक्त परतीच्या पावसात वाहून गेलेल्या भोजडे येथील नदीवरील पुलाला 07 कोटी असा एकूण 34 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी प्रयत्न केले असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने दिली आहे.

दरम्यान या नवीन आर्थिक तरतुदीमुळे नियमितपणे ये-जा करणाऱ्या शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना,कोपरगाव रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांसाठी तसेच कोपरगाव वरून शिंगणापूर,पढेगाव,कासली या मार्गे वैजापूरला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.त्याबद्दल आ.काळे यांनी केंद्रीय रस्ते,वाहतूक मंत्री नितीन गडकरी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

केंद्रीय रस्ते,वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून श्री साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन रस्ता (रा.मा.-६५) या रस्त्यासाठी व कोळ नदीवरील पुलासाठी निधी मिळावा याबाबत आ.काळेंनी निवेदन दिले होते.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील उत्तर व दक्षिण भारतासाठी जोडणारा नगर- मनमाड हा रस्ता अद्याप पूर्ण झाला नाही त्यामुळे या मार्गावर वाहतूक तुंबून अनेक प्रवाशांचे बळी जात असून झगडेफाटा ते वडगाव पान हा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून त्याचे शुक्लकाष्ठ संपलेले नाही.त्यामुळे जनतेत मोठा संताप आहे.त्याबाबत अद्यापही एकही नेत्याकडून चांगली बातमी येत नाही हे मोठे दुर्दैव असल्याचे बोलले जात आहे.



