जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

सहा वर्षात दुसऱ्यांदा काँक्रीटीकरण होणार ?

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव बस स्थानकाच्या आवारात अनेक ठिकाणी कॉंक्रीटिकरण उखडले जावून खड्डे पडले आहेत त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची हि अडचण दूर करण्यासाठी कोपरगाव बसस्थानकाच्या आगारात नव्याने सिमेंट कॉंक्रीटिकरण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.त्यामुळे अवघ्या सहा वर्षात दुसऱ्यांदा काँक्रीटीकरण होणारे कोपरगाव हे पहिलेच बस स्थानक ठरणार असल्याची जोरदार चर्चा कोपरगाव तालुक्यात सुरू झाली आहे.

मागील आ.स्नेहलता कोल्हे यांचे काळात हे काम अत्यंत निकृष्ट झाल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे आदींनी केल्या होत्या.माध्यमात याबाबत मोठी चर्चा झडली होती आणि हे काम अल्पायुषी ठरणार हा दावा खरा ठरला आहे.त्यामुळे निकृष्ट कामांचा पंचनामा करण्याची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली असल्याचे नागरिकांत आहे.

  आ.आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून कोपरगाव बस आगाराला मिळालेल्या नवीन पाच बसचे विधिवत पूजन करून त्यांचे  प्रवाशांच्या सेवेत लोकार्पण करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी आगार प्रमुख अमोल बनकर,ज्येष्ठ नेते कुदळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”कोपरगाव आगारातून राज्यासह परराज्यात जाण्यासाठी यामध्ये मुंबई,पुणे,नासिक,छत्रपती संभाजीनगर,पंढरपूर, माहूर,अक्कलकोट,गाणगापूर,कोल्हापूर,त्र्यंबकेश्वर,पैठण,बीड, शिरपूर व हैद्राबाद याठिकाणी जाण्यासाठी  अनेक लांब पल्याच्या गाड्या उपलब्ध आहेत. परंतु या गाड्या जुन्या झाल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसत होता.कोपरगाव आगाराकडे अगोदरच बसची कमी असलेली संख्या व काही बसेस जुन्या होवून कायमच नादुरुस्त होत होत्या.परिणामी प्रवाशांच्या अडचणी वाढल्या होत्या.त्यामुळे नवीन बस मिळाव्यात यासाठी परिवहन खात्याकडे नियमितपणे पाठपुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्यातून उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या सहकार्यातून पाच महिन्यापूर्वी कोपरगाव आगाराला पाच नवीन बस मिळाल्या असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

    दरम्यान यापुढील काळात अजून बस कशा मिळविता येतील यासाठी पाठपुरावा सुरूच राहील.त्यामुळे बसने मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या महिला भगिनी,विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक यांच्या अडचणी कायमच्या दूर होतील असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

  यावेळी कोपरगाव बसत स्थानकालगत सुरु असलेल्या व्यापारी संकुल व बस चार्जिंग स्टेशनच्या कामाची त्यांनी पाहणी करून लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशा सूचना दिल्या.   

  याप्रसंगी आगार प्रमुख अमोल बनकर,ज्येष्ठ नेते कुदळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close