जाहिरात-9423439946
व्यापार विषयक

रिझर्व्ह बँक आयात-निर्यातीसाठी डॉलरऐवजी रुपया वापरणार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

मुंबईः

भारतीय रुपयाबाबत जागतिक व्यापारी समुदायाची वाढती आवड लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपयामध्ये आयात आणि निर्यातीच्या सेटलमेंटसाठी अतिरिक्त व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने बँकांना भारतीय चलनात म्हणजेच रुपयामध्ये आयात-निर्यात सेटलमेंटसाठी पुरेशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. हा एक मोठा निर्णय मानला जात आहे. कारण यामुळे देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होईल आणि भारताचं डॉलरवरील अवलंबित्वही काहीसं कमी होईल.

जागतिक व्यापार वाढवण्यासाठी, भारतातून निर्यात वाढवण्यावर भर आणि भारतीय रुपयामध्ये जागतिक व्यापारी समुदायाची वाढती आवड लक्षात घेऊन, बीलनिर्मिती हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जागतिक व्यापारी समुदायाची वाढती आवड लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचललं आहे. रिझर्व्ह बँकेने एका परिपत्रकात म्हटलं आहे की, ही प्रणाली लागू करण्यापूर्वी बँकांनी परकीय चलन विभागाची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने एका अहवालात म्हटलं आहे की, जागतिक व्यापार आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं मूल्य-डॉलरीकरण करण्याचं रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्ट आहे. रिझर्व्ह बँकेने या संदर्भात जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की जागतिक व्यापार वाढवण्यासाठी, भारतातून निर्यात वाढवण्यावर भर आणि भारतीय रुपयामध्ये जागतिक व्यापारी समुदायाची वाढती आवड लक्षात घेऊन, बीलनिर्मिती हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेमेंट आणि रुपयात आयात / निर्यात सेटलमेंटसाठी अतिरिक्त व्यवस्था केली पाहिजे.

हा एक स्वागतार्ह उपक्रम वाटत असला तरी ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी व्यापारी भागीदारांशी व्यापक सल्लामसलत आवश्यक आहे. त्यांच्यापैकी किती भारतीय रुपयात व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत, यावर या उपायाचं यश अवलंबून असेल. हे आव्हान रिझर्व्ह बँकेचं आहे. अहवालात म्हटलं आहे की, भारत भारतीय रुपयामध्ये आयातीची बिले देऊ शकल्यास व्यापार भागीदार त्याच्या स्थानिक चलनात आयात सेटलमेंटसाठी विचारू शकेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close