निधन वार्ता
कोपरगाव तालुक्यातील…या शिंदे दांपत्याचे एकाच दिवशी निधन !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील वारकरी सांप्रदायाच्या शेतकरी कुटुंबातील भागीरथीबाई भगीरथ शिंदे यांचे मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या जाण्याने नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता.अंत्यविधिची तयारी चालु असताना त्यांचे पती ह.भ.प.भगीरथ दगडू शिंदे यांचेही हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी ०१ वाजता निधन झाले आहे.
स्व.भागीरथी शिंदे व भगीरथ शिंदे हे कुटुंब अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ म्हणून पढेगाव आणि परिसरात ओळखले जात होते.त्यांच्या कुटुंबावर एकाचवेळी दूहेरी संकट कोसळले.दुपारी तीन वाजेच्या सुमारास पढेगाव वैकुंठभूमीत या दांपत्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगी,दोन मुले,संतोष आणि परमेश्वर असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.