जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

..या संस्थानला तृतीय पंथीयांकडून अकरा लाखांची देणगी !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तर भारतातील चंदीगढ येथील तृतियपंथी समाजाच्‍या साईभक्‍त सोनाक्षी व त्‍यांच्‍या १० सहकार्यांनी श्री साईबाबा संस्‍थानला रोख स्‍वरुपात ११ लाख रुपये देणगी दिली आहे. याप्रसंगी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी त्‍यांचा सत्‍कार करुन आभार मानले आहे.

तृतीय पंथीयांच्या विकासाची जबाबदारी राज्यसरकारवर गत वर्षी एका विधेयकाने येऊन पडली आहे.मात्र या आधी या घटकांवर उपेक्षेचे जिने वाट्याला आल्याचे अनेकांच्या स्मरणात असेल नव्हे तसा सर्वांनाच थोडा बहुत अनुभव असतोच.आता या उपेक्षेचे जिने जगणाऱ्या घटकाने चांगल्या समजल्या जाणाऱ्या घटकाला अंतर्मुख होण्याची वेळ आणली आहे.त्याचे उदाहरण आज शिर्डीत घडले आहे.तृतीय पंथीयांनी चक्क साई संस्थानला अकरा लाखांची देणगी दिली आहे.विश्वास बसत नाही ना ! पण हि घटना खरी आहे

विधेयकात नमूद केल्याप्रमाणे,जन्मल्यानंतर जिचे लिंग ठरवता येत नाही अशी व्यक्ती म्हणजे तृतीयपंथी.लिंगबदल शस्त्रक्रिया केलेली किंवा न केलेली व्यक्ती,उभयलिंगी लक्षणे दिसणारी व्यक्ती त्याचप्रमाणे समाजाने किन्नर,हिजडा,अरावनी व जोगता या नावांनी ओळखली जाणारी व्यक्ती म्हणजे तृतीयपंथी होय.देशातील तृतीयपंथीयांना सामाजिक समता मिळून त्यांचे आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण होण्याचा मार्ग नुकताच मोकळा झाला आहे.समाजाकडून होणारा त्यांचा उपहास,अवहेलना थांबवणारे तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयक गत वर्षी २०१९ केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे.त्यामुळे आता त्याच्या विकासाची जबाबदारी राज्यसरकारवर येऊन पडली आहे.मात्र या आधी या घटकांवर उपेक्षेचे जिने वाट्याला आल्याचे अनेकांच्या स्मरणात असेल नव्हे तसा सर्वांनाच थोडा बहुत अनुभव असतोच.आता या उपेक्षेचे जिने जगणाऱ्या घटकाने चांगल्या समजल्या जाणाऱ्या घटकाला अंतर्मुख होण्याची वेळ आणली आहे.त्याचे उदाहरण आज शिर्डीत घडले आहे.तृतीय पंथीयांनी चक्क साई संस्थानला अकरा लाखांची देणगी दिली आहे.विश्वास बसत नाही ना ! पण हि घटना खरी आहे.आज त्याची अनुभूती साई संस्थानच्या अधिकाऱ्यांना आली आहे.व वाक होण्याची वेळ आली आहे.त्यामुळे समाजाला आता याघटकाला उपेक्षेचे जगणे वागवणे सोडून द्यावे लागणार आहे.
यावेळी साईभक्‍त सोनाक्षी व त्‍यांच्‍या १० सहकारी म्‍हणाल्‍या की,आम्‍ही सर्व चंदीगढ येथून अनेक ठिकाणी भेट देत-देत शिर्डी येथे आलेलो आहोत.श्री साईबाबांचे दर्शन घेऊन आम्‍हाला सर्वांना आत्‍मीक शांती मिळाली.आम्‍हाला या ठिकाणी चांगली शिस्‍त बघायला मिळाली.श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने कोव्‍हीड-१९ च्‍या पार्श्‍वभूमीवर अतिशय चांगल्‍याप्रकारे उपाययोजना करण्‍यात आलेल्‍या आहेत.सर्व साईभक्‍त मास्‍कचा वापर व सामाजिक अंतराच्‍या नियमांचे पालन करताने दिसत आहेत.दर्शन व्‍यवस्‍थेबाबत कुणाची कुठलीही तक्रार नाही.

संस्‍थानच्‍या वतीने कोव्‍हीड-१९ च्‍या पार्श्‍वभुमीवर केलेली व्‍यवस्‍था ही साईभक्‍तांच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने हिताची असुन सर्वांनी नियमांचे पालन करुन श्री साईबाबांच्‍या दर्शनाचा लाभ घ्‍यावा असे सांगुन लवकरच कोरोनाचे सावट संपावावे अशी प्रार्थना ही सोनाक्षी व त्‍यांच्‍या सहकार्यांनी साईचरणी केली आहे.

सरदचे साईभक्‍तांनी देणगी दिलेली असल्‍याने संस्‍थानकडून दर्शन आरतीचा मोफत पास उपलब्‍ध असूनही त्‍यांनी त्‍यास नम्रपणे नकार देऊन विहीत मार्गानेच दर्शनरांगेतून दर्शन घेणे पसंत केले आहे.काही महिला भक्‍तांकडून दर्शन आरती व दर्शनासाठी देणगीची मागणी केली जाते या तथाकथीत बातमीच्‍या पार्श्‍वभूमीवर सदरची बाब निश्चितच स्‍पृहणीय आहे.संस्‍थानच्‍या वतीने या सर्वांना हार्दिक धन्‍यवाद देण्‍यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close