जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

साई संस्थान निवासस्थान परिसरात दोनदा घंटा गाडी येणार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्थेच्‍या वतीने कर्मचारी निवासस्‍थान परिसरातील कच-यावर प्रतिबंध घालणेकामी तसेच ओला-सुका कचरा संकलन करणेकामी कर्मचारी निवासस्‍थान परिसरात दररोज दोन वेळेस घंटागाडी सुरु करण्‍यात आली असून या घंटागाडीचा शुभारंभ संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आले आहे.

श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने विविध विभागांमध्‍ये कार्यरत असणारे अधिकारी-कर्मचारी यांना तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात निवासासाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेले निवासस्‍थान इमारती व परिसरात कर्मचा-यांचे आरोग्‍य सुस्थितीत राहणे करीता व परिसरातील कच-यांवर प्रतिबंध घालणेसाठी संस्‍थानच्‍या आरोग्‍य विभागामार्फत ओला-सुका कचरा संकलन करण्याचे काम करण्यात येणार आहे.

सदरचा शुभारंभ कार्यक्रम आज सकाळी ०९.०० वाजता श्री साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम) येथे पार पडला आहे.या कार्यक्रमास संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे,प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले,मुख्‍यअभियंता रघुनाथ आहेर,आरोग्‍य विभाग प्रमुख प्रताप कोते, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना कान्‍हूराज बगाटे म्‍हणाले की,”श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने विविध विभागांमध्‍ये कार्यरत असणारे अधिकारी-कर्मचारी यांना तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात निवासासाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेले निवासस्‍थान इमारती व परिसरात कर्मचा-यांचे आरोग्‍य सुस्थितीत राहणे करीता व परिसरातील कच-यांवर प्रतिबंध घालणेसाठी संस्‍थानच्‍या आरोग्‍य विभागामार्फत ओला-सुका कचरा संकलन करणेकामी दररोज दोन वेळेस घंटागाडी सुरु करण्‍यात आलेली आहे.
सर्व निवासस्‍थान कर्मचारी यांनी आपले घरातील दररोज निघणा-या कच-याचे ओला-सुका असे विलगीकरण करुन सदरचा कचरा हा संस्‍थानच्‍या घंटागाडीतच टाकावा.तसेच आपले परिसरात कुठेही इतरत्र कचरा होणार नाही याची दक्षता कर्मचा-यांनी घ्‍यावी.तसे आढळुन आल्‍यास संस्‍थानमार्फत दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येईल,असे ही शेवटी कान्‍हूराज बगाटे यांनी इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close