जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात पाच लाखांची लुट,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात काल रात्री १०.२५ वाजेच्या सुमारास आपल्या घरी निवाऱ्यात जात असताना व्यावसायिक दिलीप शंकर गौड (वय-३५) यांना बजाज पल्सर व होंडा शाईन या दोन गाड्यावरून आलेल्या चार लुटारूनी धारदार चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील ४ लाख ९८ हजार ९०० रुपयांची लुट केल्याची खळबळजनक घटना घडली असून या बाबत अज्ञात चार गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील मद्य व्यापारी आपले दुकान बंद करून निघाले असता भाई-भाई मोटार गॅरेज समोर होंडा शाईन व बजाज पल्सर या दोन दुचाकी वरून आलेल्या व पाळत ठेऊन असलेल्या अज्ञात चार चोरट्यानी त्याना लोखंडी धारदार चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे ०४ लाख ९८ हजार ९०० रुपये रोख रक्कम,टॅब,सॅमसंग कंपनीचे २ अँनड्राईड फोन तसेच कागदपत्रे असा ऐवज लंपास केला आहे.नूतन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्यापुढे या तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरक्षक राकेश मानगावकर यांची नगर येथें कोतवालीत बदली झाल्यापासून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी उचल खाल्ली असल्याचे स्पष्ट दिसत आहे.कोपरगावात पोलीस निरीक्षक खंबीर असल्याशिवाय गुन्हेगारी नियंत्रणात राहात नाही.त्याचा उत्तम नमुना सध्या उघड झाले आहे.काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील मद्य व्यापारी आपले दुकान बंद करून निघाले असता भाई-भाई मोटार गॅरेज समोर होंडा शाईन व बजाज पल्सर या दोन दुचाकी वरून आलेल्या व पाळत ठेऊन असलेल्या अज्ञात चार चोरट्यानी त्याना लोखंडी धारदार चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे ०४ लाख ९८ हजार ९०० रुपये रोख रक्कम,टॅब,सॅमसंग कंपनीचे २ अँनड्राईड फोन तसेच कागदपत्रे असा ऐवज लंपास केला आहे.या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री सातव,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे आदींनी भेट दिली आहे.

या प्रकरणी फिर्यादी व्यावसायिक दिलीप शंकर गौड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.८३८/२०२० भा.द.वि.कलम ३९७,३४ प्रमाणे अज्ञात फिर्यादी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस उप निरीक्षक भरत नागरे हे करित आहेत.

या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.व आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close