जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात उद्या आशुतोष काळेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची जाहीर सभा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार तथा कर्मवीर काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा कोपरगाव येथे उद्या १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे संपन्न होणार आहे.त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांनी मागील पाच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी व सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने संघर्ष केलेला आहे. ज्या-ज्यावेळी मतदार संघातील अन्याय झाला त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. कोपरगाव तालुक्याला दुष्काळी यादीतून वघळल्याच्या निषेधार्थ केलेले आमरण उपोषण तसेच चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरण व पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्यासाठी सलग नऊ दिवस केलेल्या धरणे आंदोलणामुळे सर्व सामान्यांसाठी लढणारे नेतृत्व म्हणून मतदार संघातील जनता आज आशुतोष काळे यांच्याकडे पाहत आहे.


कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांनी मागील पाच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी व सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने संघर्ष केलेला आहे. ज्या-ज्यावेळी मतदार संघातील अन्याय झाला त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. कोपरगाव तालुक्याला दुष्काळी यादीतून वघळल्याच्या निषेधार्थ केलेले आमरण उपोषण तसेच चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरण व पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्यासाठी सलग नऊ दिवस केलेल्या धरणे आंदोलणामुळे सर्व सामान्यांसाठी लढणारे नेतृत्व म्हणून मतदार संघातील जनता आज आशुतोष काळे यांच्याकडे पाहत आहे. त्यांच्या प्रचार सभेसाठी खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार येत आहे. अगोदर पासूनच आशुतोष काळे यांच्या प्रचारात कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून पवार यांच्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे. कोणत्याही प्रकारचा संबंध नसतांना शरद पवार अंमलबजावणी संचालनालयाने केलेली कारवाई त्या कारवाईला बिनदिक्कतपणे सामोरे गेलेले आहेत व अंमलबजावणी संचालनालयाने कार्यवाही बाबत मागे घेतलेले पाऊल यामुळे संपूर्ण राज्यात पवार यांचेबद्दल सहानुभूती निर्माण झालेली आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी सभा घेण्याचा धडाका लावला असून राज्यात ठिकठीकाणी युवा वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांची विजयपथाकडे वाटचाल सुरु झाली आहे. आज होणाऱ्या सभेला मोठी गर्दी होणार आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोपरगावमध्ये सर्वप्रथम सभा घ्यावी लागली यावरून भाजपसाठी कोपरगावची जागा धोक्यात असल्याचे बोलले जात असून पवार यांच्या सभेमुळे कोणती सभा मोथो झाली याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close