जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

वाकडी येथील खंडोबा मंदिर खुले करा-मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

वाकडी-(प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्ह्याची जेजुरी म्हणून पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले राहाता तालुक्यातील वाकडी येथील खंडोबा मंदिर भक्तांसाठी उघडून द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब कोते यांनी नुकतीच आमच्या प्रतिनिधिकडे बोलताना केली आहे

जगभर कोरोना विषाणूने कहर केला आहे.त्यामुळे गेली पाच महिने पासून कोरोना आजाराने सर्वत्र मंदिर बंद आहे.अद्याप बहुतेक ठिकाणची मंदिर खुली करण्यात आली नाही.यामुळे बहुतेक मंदिरातील विविध यात्रा उत्सव बंद असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.सध्या सर्वत्र मोजक्या लोकांमधे मुखपट्या व सुरक्षित अंतर ठेऊन लग्न कार्य सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे वाकडी येथील देवस्थान खुले भक्तांसाठी करावे-कोते

जगभर कोरोना विषाणूने कहर केला आहे.त्यामुळे गेली पाच महिने पासून कोरोना आजाराने सर्वत्र मंदिर बंद आहे.अद्याप बहुतेक ठिकाणची मंदिर खुली करण्यात आली नाही.यामुळे बहुतेक मंदिरातील विविध यात्रा उत्सव बंद असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.सध्या सर्वत्र मोजक्या लोकांमधे मुखपट्या व सुरक्षित अंतर ठेऊन लग्न कार्य सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नवविवाहित जोडपे लग्न होताच प्रथम खंडोबा चरणी लिन होऊन संसाराला सुरुवात करण्याचा प्रघात आहे.अहमदनगर जिल्ह्यातील बहुतेक नवविवाहित जोडपे जेजुरी न जाता राहता तालुक्यातील वाकडी येथील खंडोबा मंदिरात दर्शनास येतात. मात्र गेली पाच महिण्यापासून खंडोबा मंदिर बंद असून भाविकांची गर्दी खंडित झाली आहे. मात्र नवविवाहित जोडपे व खंडोबाभक्त दर्शनास आल्यावर मंदिर बंद असल्याने नाराजी व्यक्त करत आहे. तरी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत असलेल्या खंडोबाचे अनेक भक्त आहे.वाकडी येथील खंडोबा देवाचे हजारो भक्त असून या खंडोबा मंदिरात मुखपट्या व प्रतिबंधात्मक साधने वापरून व तत्सम नियमावली बनवून त्या नुसार मंदिर खुले करावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे युवा मंचचे आण्णासाहेब कोते यांनी शेवटी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close