नगर जिल्हा
राहाता तालुक्यात गौरींचे उत्साहात विसर्जन संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(प्रतिनिधी)
राज्यात मोठ्या भक्तिभावाने गेल्या तीन दिवसापूर्वी आलेल्या व घरोघरी सुरू असलेल्या उत्सवातील ज्येष्ठा गौरींचे आज गुरुवार दि. २७ ऑगस्ट रोजी शिर्डी,सावळीविहीर व परिसरात उत्साहात पूजन करून मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले आहे.देशातुन,राज्यातुन कोरोना हद्दपार व्हावा,यासाठी ज्येष्ठा गौरीना भाविकांनी, सौभाग्यवतींनी प्रार्थना केली व जेष्ठा गौरीचे आज पूजन करून भक्तीभावाने त्यांना निरोप देत विसर्जन करण्यात आले आहे.
गौरीपूजन वा महालक्ष्मी पुजन हे हिंदू महिलांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे. गौरीपूजन हा महाराष्टातल्या सणांपैकी एक सणही आहे. यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात.
राहाता तालुक्यात गावागावातून मंगळवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी जेष्ठा गौरीला आवाहन करून,तिचे स्वागत करत,प्रतिष्ठापना घराघरात करण्यात आली होती.भाद्रपद महिन्यात गणेश उत्सवातच ज्येष्ठा गौरींचेही ही आगमन होत असते व तीन दिवस हा उत्सव सुरू असतो.दि.२५ ला मंगळवारी ज्येष्ठा गौरीची प्रतिष्ठापना करून, बुधवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी जेष्ठा गौरी पूजन करून सौभाग्यवती महिलांना व भाविकांना घरोघरी या कोरोनाच्या संकटामुळे अटी व शर्ती ठेवून महाप्रसाद देण्यात आला,तसेच ज्येष्ठ गौरीनाही पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.तसेच काही ठिकाणी मिठाई व फळफळावळ यांचाही नैवेद्य ठेवण्यात आला.ज्येष्ठा गौरींच्या नैवेद्याची व पूजनाची घरोघरी वेगवेगळी अशी प्रथा असून ती मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते .आज गुरुवारी जेष्ठा गौरीचे विसर्जन होते.सकाळीच पूजाअर्चा करून दुपारी १२.३६च्या मुहुर्तानंतर घराघरात प्रतिष्ठापना केलेल्या ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करण्यात आले.यावेळी अनेक सौभाग्यवती महिलांनी,भाविकांनी जेष्ठा गौरीला देशातील, राज्यातील नागरिक समाधानी आनंदी राहू दे! सर्वांची भरभराट होऊ दे !तसेच देशातून, राज्यातून कोरोना हद्दपार होऊ दे! अशी प्रार्थना केली.तीन दिवस चाललेला ज्येष्ठा गौरींचा हा उत्सव मोठ्या आनंदात आज संपन्न झाला.या जेष्ठागौरी उत्सवा संदर्भात जेष्ठा गौरीभक्त,सुमन व नाना त्र्यंबक जाधव आणि अश्विनी गणेश जाधव यांनी बोलताना सांगितले की, आम्ही आमच्या पूर्वजांपासून गेल्या अनेक वर्षापासून ज्येष्ठा गौरीची प्रतिष्ठापना करत आलो आहोत.भक्तिभावाने जेष्ठा गौरींचे तीन दिवस मोठा उत्सव पूजन मनोभावे करतो.पहिल्या दिवशी जेष्ठा गौरीचे आगमन स्वागत करुन प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी मखर व आरास सजावट घरात केली जाते. तेथे ज्येष्ठा गौरीची प्रतिष्ठापना होऊन पूजन केले जाते. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ गौरीना पुरणपोळीचा नैवेद्य तसेच मिठाई,फळे,नैवेद्य म्हणून ठेवली जातात व या दिवशी आसपासच्या सौभाग्यवती महिला यांना पुरणपोळी व इतर मिठाई नैवेद्य म्हणून महाप्रसाद दिला जातो व तिसऱ्या दिवशी जेष्ठा गौरींचे पूजन करून विसर्जन केले जाते.आज जेष्ठा गौरींचे मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले आहे.जेष्ठा गौरीला आम्ही यावर्षी देशातून ,राज्यातून कोरोणा हद्दपार व्हावा.अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तसेच पुढील वर्षी लवकर जेष्ठा गौरींचे आगमन व्हावे.असीही कामना व्यक्त केली.
यावेळी गणेश नाना जाधव,बेबीताई सोनवणे,कु.गौरी व श्रद्धा गणेश जाधव,सुमनताई जाधव,नाना जाधव,अश्विनी जाधव, सोनाली गायकवाड,संगीता सूर्यवंशी, व कु.भाग्यश्री,जयदीप,राज,विशाल,आदी उपस्थित होते.