जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

…या वाड्याच्या संवर्धनासाठी निधी मंजूर-माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरातील ऐतिहासिक राघोबादादा पेशवे यांचा पुरातन वाडा गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस येऊन अस्तित्वाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचला होता.याची गांभीर्याने दखल घेवून या वाडा संवर्धनासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला.त्यातील ३ कोटी ६२ लाख २३ हजार रुपयांच्या दुसऱ्या हफ्त्याच्या निधीला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

‘श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांचा वाडा’
पुणे येथील शनिवारवाडा असो वा नाशिकचा सरकारवाडा,या प्रत्येक वाड्याने मराठा सत्तेची भरभराट आणि ऱ्हास जवळून अनुभवला आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगांव येथे,पवित्र गोदावरीच्या काठी उभा असलेला असाच एक महत्त्वपूर्ण,मात्र काहीसा दुर्लक्षित ऐतिहासिक वारसा म्हणजे ‘श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांचा वाडा’.हा भव्य वा स्थानिक नागरिकांमध्ये ' हा राघोबा दादा यांचा वाडा' किंवा 'विटाळशीचा वाडा' या नावाने ओळखला जातो.

   मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले पेशव्यांचे वाडे म्हणजे केवळ दगड-मातीचे बांधकाम नव्हे, तर ते राजकीय महत्त्वाकांक्षा, स्थापत्यशास्त्राची भव्यता आणि सत्तासंघर्षाची केंद्रे ठरली आहेत.पुणे येथील शनिवारवाडा असो वा नाशिकचा सरकारवाडा,या प्रत्येक वाड्याने मराठा सत्तेची भरभराट आणि ऱ्हास जवळून अनुभवला आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगांव येथे,पवित्र गोदावरीच्या काठी उभा असलेला असाच एक महत्त्वपूर्ण,मात्र काहीसा दुर्लक्षित ऐतिहासिक वारसा म्हणजे ‘श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांचा वाडा’.हा भव्य वा स्थानिक नागरिकांमध्ये ‘ हा राघोबा दादा यांचा वाडा’ किंवा ‘विटाळशीचा वाडा’ या नावाने ओळखला जातो.सुमारे १२०० फूट लांबी केंद्र आणि ६५० फूट असणाऱ्या या अवाढव्य आकाराची,ही वास्तू एक इतिहास प्रेमामध्ये आकर्षक मानले जाते,राघोबा दादा यांना बाराभाईं यांनी निर्वासित केल्यावर त्यांचे या ठिकाणी वास्तव्य घडले होते.हा वाडा राघोबादादांच्या स्वप्नांच्या अंताचे आणि त्यांच्या उत्तरार्धाचे प्रतीक आहे.मात्र याची दुरावस्था झाल्याने कोपरगावच्या इतिहासाच्या पाऊलखुणा बुजतात की काय असा प्रश्न इतिहास प्रेमी व कोपरगावकरांना पडला होता.मात्र आ.काळे यांनी राघोबादादा वाड्याच्या संवर्धनासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे पाठपुरावा करून एकूण ७ कोटी २७ लक्ष ७० हजार रुपये निधी उपलब्ध केला होता.यातील पहिला हफ्ता प्राप्त होऊन वाड्याच्या सावर्धानाचे काम चालू असताना नुकत्याच दुसऱ्या हफ्त्याच्या ३ कोटी ६२ लाख २३ हजार रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.


   कोपरगाव शहराची अर्थव्यवस्था समृद्ध होण्यासाठी पर्यटन क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.याच पार्श्वभूमीवर भविष्याचा वेध घेत आ.काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाबरोबरच पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे मानले जात आहे.ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने राघोबादादा वाडा या वास्तूच्या संवर्धनाचा निर्णय घेतला असून,या उपक्रमामुळे कोपरगाव शहराकडे पर्यटकांची पावले वळण्यास मदत होणार आहे.या निर्णयामुळे स्थानिक व्यवसायवृद्धीवर दूरगामी सकारात्मक परिणाम होईल.या उपक्रमामुळे कोपरगावकर व इतिहासप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close