जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

…या ठिकाणी कानिफनाथ मंदिरांचे भूमिपूजन!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे गोरक्षनाथ रामचंद्र थोरात यांचे जुना येवला रस्त्याच्या लगत असलेल्या शेतात नुकतेच कानिफनाथ महाराज यांचे मंदिराचे भूमिपूजन कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

भगवान कानिफनाथ महाराज मंदिराचे भूमिपूजन करताना जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे महंत रमेशगिरीजी महाराज व अन्य मान्यवर दिसत आहे.

दरम्यान आपण लवकरच भगवान कानिफनाथ मंदिराचे बांधकाम करून हे मंदिर लोकार्पण करणार असल्याचे मनोगत गोरक्षनाथ थोरात व त्यांचे सुपुत्र माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश थोरात यांनी व्यक्त केले आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

उपस्थिताना मार्गदर्शन करताना महंत रमेशगिरीजी महाराज.

दरम्यान या आधीही जवळके येथे नाशिककडे जाताना श्री क्षेत्र शिर्डी येथील संत श्री साईबाबा जवळके येथील चौफुलीवर थांबत असत व विश्रांती करत असल्याची माहिती त्यावेळचे या थोरात कुटुंबातील अनेक समकालिन पूर्वज सांगत असत.

  कानिफनाथ महाराज हे नवनाथ संप्रदायातील प्रमुख नाथयोगी आणि भगवान कार्तिकेयांचे अवतार मानले जातात.ते शाबरी विद्येचे जनक असून त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी येथे फाल्गुन वद्य रंगपंचमीला संजीवनी समाधी घेतली.कानिफनाथ हे प्रबुद्धनारायणाचा अवतार मानले जातात आणि नाथ पंथात त्यांना मोठे स्थान आहे.त्यांनी मढी वरून वणी येथील तीर्थक्षेत्री जाताना या शेतात विश्रांती केली असल्याचे मानले जाते.जवळके हे भूमी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली असल्याचे मानले जाते.त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ हे मंदिर उभे राहत आहे.गोरक्षनाथ थोरात आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या स्वप्नात दृष्टांत दिल्याने त्यांनी अनेक साधू महंतांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी कानिफनाथ मंदिर उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचे भूमिपूजन संपन्न झाले आहे.

  सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष कैलास रहाणे,जलसंपदाचे माजी उपअभियंता एस.के.थोरात,गोदावरी दूध संघाचे संचालक यशवंत गव्हाणे,जवळके विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष लक्ष्मण थोरात,गोरक्षनाथ वाकचौरे,माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गव्हाणे,डॉ.राहुल शेटे,गोरक्षनाथ थोरात,बाळासाहेब थोरात,आदींसह बहुसंख्येने नाथपंथी भाविक भक्त उपस्थित होते.

    दरम्यान आपण लवकरच भगवान कानिफनाथ मंदिराचे बांधकाम करून हे मंदिर लोकार्पण करणार असल्याचे मनोगत गोरक्षनाथ थोरात व त्यांचे सुपुत्र माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश थोरात यांनी व्यक्त केले आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close