जाहिरात-9423439946
खेळजगत

कोपरगाव तालुक्यातील…या स्कूलच्या व्हाँलीबॉल संघाची विभागीय पातळीवर निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.नगर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय व्हाँलीबॉल स्पर्धेचे आयोजन दि.२५.डिसेंबर रोजी त्रिमृर्ती क्रिडा सकुंल,नेवासा.येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या व्हाँलीबॉल संघाने विजेतेपद पटकावुन जिल्हयाचे नेतृत्व करण्याचा मान मिळविला आहे अशी माहिती माहिती प्राचार्य नूर शेख यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

या विजयात संघासाठी मानसी देवरे,आयशा खान,श्रेया पटारे,दिपाली मोरे,प्रगती तासकर,प्राजंल ठाकरे,संजना पाटील, मृणाल श्रीरसागर यांनी लक्षवेधी खेळ केला असल्याची माहीती हाती आली आहे.

गौतमच्या संघाने अंतिम सामन्यात डि-पॉल पब्लिक स्कूल,(राहुरी) या संघाचा दोन सरळ सेटमध्ये २५-१३व २५-२२ ने पराभव केला.या विजयामुळे गौतमचा संघ विभागीय स्पर्धेसाठी जिल्हयाचे नेतृत्व करणार आहे.

या विजयात संघासाठी मानसी देवरे,आयशा खान,श्रेया पटारे,दिपाली मोरे,प्रगती तासकर,प्राजंल ठाकरे,संजना पाटील, मृणाल श्रीरसागर यांनी लक्षवेधी खेळ केला असल्याची माहीती हाती आली आहे.

गौतम पब्लिक स्कूलच्या संघास शाळेचे फिजीकल डायरेक्टर सुधाकर निलक,व्हाँलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव क्रिडाशिक्षक रमेश पटारे,सोहेल शेख यांचे मार्गदर्शन लाभले होते.
सदर स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी.आ.अशोक काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाड,संस्थेच्या सचिव चैताली काळे तसेच संस्थेचे सर्व सदस्य व पालक व माजी विद्यार्थी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close