जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

कोपरगावातील…या विद्यालयात सेमी ऑलम्पिक जलतरण तलावाचे उद्घाटन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरानजीक असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूल येथे आंतराष्ट्रीय जलतरण तलावाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय जलतरण सुवर्णपदक विजेत्या डॉ.सुषमा आचार्य,डॉ.राजेश्वरी पवार यांच्या हस्ते स्विमींग पूलचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

समताच्या २०२२-२३ च्या वार्षिक तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा विभागाचा धजारोहन करत करण्यात आले.बॅडमिंटन,टेनिस,क्रिकेट,स्विमींग,हॉकी,बास्केटबॉल,रनिंग,बुद्धिबळ आदी क्रीडा प्रकारांचा समावेश सलग तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये असणार आहे.

सदर प्रसंगी समता चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शहा,डॉ.सुषमा आचार्य,डॉ.राजेश्वरी पवार,समता इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,संस्थेच्या संचालक स्वाती कोयटे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना काका कोयटे म्हणाले की,”समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात तालुका,जिल्हा,राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकास्पद कामगिरी केली आहे.सुवर्ण,कास्य ब्रांझ यांसारख्या पदकांनाही मोठ्या प्रमाणात गवसणी घातली आहे.क्रीडा क्षेत्रातील त्यांचे हे गुण ओळखून त्यांना या पुढे ही विविध क्रीडा प्रकारांमध्ये समताचा झेंडा फडकवता यावा आणि स्वतःच्या करिअरला नवीन दिशा देता यावी हा आमचा मुळ उद्देश आहे.स्विमिंग या क्रीडा प्रकारामध्ये समता स्कूलच्या क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली समता स्कूलचे विद्यार्थी विविध स्तरावर यश संपादन करतील असा आशावाद व्यक्त केला आहे.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समीर अत्तार यांनीं केले तर उपस्थितांचे आभार इ.१० वीतील अनय बोरनारे व सृष्टी कालेकर,नूतन लाहोटी हिने मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close