जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात…या स्कूलची विजयी सलामी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ,नगर येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व गौतमनगर येथील गौतम पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (१४ वर्ष वयोगट) गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघाने आत्मा मलिक स्कूल संघाचा ४-० असा पराभव करत विभागीय स्पर्धेत अ,नगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळवला आहे.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या स्पर्धेत १९ वर्ष व १४ वर्ष वयोगटातील मुले व मुली असे एकूण १४ संघ सहभागी झाले होते.या चुरशीच्या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघाने आत्मा मलिक स्कूल संघाचा ४-० असा पराभव करत विभागीय स्पर्धेत अ,नगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळवला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अ,नगर येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व गौतम पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ वर्ष व १९ वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर दिनांक ७ डिसेंबर रोजी पार पडल्या आहेत. यावेळी सहभागी संघ,प्रशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर स्पर्धेत १९ वर्ष व १४ वर्ष वयोगटातील मुले व मुली असे एकूण १४ संघ सहभागी झाले होते.या चुरशीच्या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघाने आत्मा मलिक स्कूल संघाचा ४-० असा पराभव करत विभागीय स्पर्धेत अ,नगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळवला आहे.विभागीय स्पर्धा ह्या दिनांक १६ डिसेंबर २०२२ ते १८ डिसेंबर २०२२ या दरम्यान गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर होणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी दिली आहे.

यशस्वी सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,विश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे,प्राचार्य नुर शेख आदींनी अभिनंदन केले आहे.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक सुधाकर नीलक,हॉकी रमेश पटारे,सोहेल शेख यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली असून पंच म्हणून अकबर शेख,समीर शेख यांनी काम पाहिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close