खेळजगत
कोपरगाव तालुक्यातील..या रस्त्यासाठी १० कोटींचा निधी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राजमार्ग ७ वरील देर्डे फाटा ते शहाजापूर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले असून यापुढील तालुका हद्दीपर्यंत रस्त्यासाठी १० कोटी निधी मंजूर झाला असून या रस्त्याचा देखील प्रश्न कायमचा मार्गी लावण्यात यश मिळाले असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
सदर प्रसंगी वेळापूरच्या कार्यकर्त्यांनी वेळापूर विविध कार्यकारी सह.सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सत्तापरिवर्तन करून सर्वच्या सर्व जागेवर काळे गटाचे उमेदवारांनी विजय मिळविल्याबद्ल सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा आ.काळे यांनी सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथे ५४ लाख निधीतून करण्यात आलेल्या प्रकाश रणधीर घर ते म्हस्के बाबा चौफुली रस्ता मजबुतीकरण आणि रा.मा. ७ सतिष बोरावके वस्ती ते शिवाजी मोरे वस्ती रस्ता (ग्रा.मा.२०) डांबरीकरण कामाचे लोकार्पण नुकतेच आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
त्यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की,”मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची मोठी मदत झाली आहे.मतदार संघाची वाढती लोकसंख्येचा विचार करून दळणवळणाच्या सोयी सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे.त्या दृष्टीने मतदार संघातील अनेक रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात आली असून यापुढील काळात देखील बहुतांश रस्त्यांची दर्जोंन्नती करून रस्ते विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,माजी उपसभापती अर्जुन काळे,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक तिरसे,सचिन रोहमारे,सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे,वसंतराव वैराळ,अशोक आहेर,गणपत वैराळ,रतनराव कदम,श्रीपत वैराळ,बळवंत पगारे,दिलीप वैराळ,वेळापूर सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक राजेंद्र गुजर,नवनाथ गोरे,सोपान जाधव,दिपक पाटोळे, अशोक भगत,जयवंत मंडलिक,अमोल वैराळ,सुनील वैराळ,बाळू पगारे,परिघाबाई खोडके,मंगल गोरे,विजय आहेर,बाळासाहेब शिंदे तसेच जगन गोरे,ज्ञानेश्वर हाळनोर,बाजीराव मंडलिक,सार्वजनिक बांधकाम उपकार्यकारी अभियंता प्रशांत वाकचौरे,शाखा अभियंता दिलीपराव गाडे,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.