खेळजगत
बुद्धिबळ स्पर्धेत कोपरगावातील…या विद्यार्थिनीला सुवर्ण पदक!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गुजरात मधील सुरत येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुवर्णपदक प्राप्त असून के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी गाडे हिने महत्त्वाची भूमिका बजावली असून तिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सुवर्णपदक प्राप्त करून दिले आहे तिच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कु.साक्षी गाडे ही कोपरगाव येथील एस.टी आगारातील वाहतूक नियंत्रक संजीव गाडे यांची कन्या असून तिने जिल्हा व राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विविध पारितोषिके प्राप्त केलेले आहेत.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान तिची चेन्नई येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोपरगाव तालुका व अहमदनगर जिल्ह्यातून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्तरावर यश मिळवणारी कु.साक्षी गाडे ही पहिली खेळाडू ठरली आहे.साक्षी गाडे हे की के.जे.सोमैया महाविद्यालयांमध्ये वाणिज्य विभागातील तिसऱ्या वर्षाच्या वर्गात शिकत आहे व ती सी.ए.चे शिक्षणही घेत आहे.
कु. साक्षी गाडे ही कोपरगाव येथील एस.टी आगारातील वाहतूक नियंत्रक संजीव गाडे यांची कन्या असून तिने जिल्हा व राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विविध पारितोषिके प्राप्त केलेले आहेत.
कु.साक्षी गाडेला या यशाबद्दल कोपरगाव परिसरातून तिच्यावर अभिनंदन होत आहे.साक्षी गाडे हिला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ.सुनील कुटे यांचे मार्गदर्शन लाभले होते.
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव अॅड.संजीव कुलकर्णी, सदस्य संदीप रोहमारे,प्राचार्य डॉ.बी एस यादव,महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे आदींनी तिचा सत्कार करून तिला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.