खेळजगत
कोपरगावात आंतरविभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कोपरगाव येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालय यांचे सयुंक्त विद्यमाने आयोजित आंतरविभागीय पॉवरलिफ्टिंग (मुले व मुली) स्पर्धा कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत नगर,पुणे शहर,पुणे जिल्हा तसेच नाशिक विभागातील ३६ मुले व ३९ मुलींसह एकूण ७५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत मुलांच्या गटातील सर्वसाधारण विजेतेपद पुणे शहर व पुणे जिल्हा विभागाने तर मुलींच्या गटातील सर्वसाधारण विजेतेपद नाशिक विभागाने पटकावत लक्षवेधी यश संपादन केले. स्पर्धेचे सर्वसाधारण उपविजेतेपद पुणे शहर विभागातील मुलींनी पटकावले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रतिनिधी व एम.आय.टी.विश्वशांती विद्यापीठ,पुणे येथील क्रीडा संचालक प्रा.डॉ.पोपटराव धनवे,स्पर्धा निरीक्षक डॉ.कुशाबा पिंगळे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.सानप या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले होते.
या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ २०२१ -२२ चा “स्ट्रॉग मॅन” हा किताब नगर विभागातील एस. एस.जी.एम.कॉलेजचा खेळाडू अश्विन सोलंकी याने तर “स्ट्रॉंग मॅन” हा किताब पुणे शहर विभागातील पोर्णिमा शिंदे हिने प्राप्त करीत घवघवीत यश मिळविले आहे.या स्पर्धेतून निवड समितीने निवडलेला संघ जे.आर.एन.राजस्थान विद्यापीठ,उदयपुर येथे संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
सदर स्पर्धेसाठी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून प्रा.डॉ.पोपटराव धनवे व स्पर्धा निरीक्षक म्हणून डॉ. कुशाबा पिंगळे यांनी कामकाज पहिले.या स्पर्धेसाठी विजय पाटील (पुणे),सागर मोरे (पुणे), अजिंक्य जोशी (पुणे),राजेंद्र सोनवणे (पाथर्डी),महेश निंबाळकर (श्रीरामपूर),सतीश रासकर (श्रीरामपूर),विजय देशमुख (पाथर्डी),डेव्हिड मकासरे (नगर), या राज्य व राष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून काम केलेल्या अनुभवी पंचांनी काम पहिले.स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचे व्यवस्थापक म्हणून प्रा.योगेश आव्हाड (नगर विभाग-मुले ) प्रा.शांताराम ढमाले (पुणे शहर मुले-मुली ) प्रा. अनिल मरे (पुणे जिल्हा-मुले ) प्रा.चेतन आव्हाड ( नाशिक विभाग–मुले),प्रा.शांताराम साळवे (अहमदनगर- मुली ) प्रा.प्रतिमा लोणारी (पुणे जिल्हा -मुली) प्रा.अजयकुमार नायर (नाशिक विभाग- मुली) आदींनी महत्वाची भूमिका बजावली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. आर.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संयोजन सचिव म्हणून महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.सुभाष देशमुख यांनी नियोजन केले होते.
सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जुनिअर विभाग शारीरिक शिक्षण संचालक प्रा.शिवप्रसाद जंगम, प्रा.आकाश लकारे,जिमखाना समिती चेअरमन प्रा.सुनील सालके सर्व सदस्य,लोडर व स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.