खेळजगत
श्री गंगागिरीजी महाविद्यालयात आंतरवर्गीय स्पर्धास प्रारंभ
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयामध्ये आंतरवर्गीय वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन महाविद्याल्याचे प्राचार्य डॉ.एस.आर. थोपटे यांनी मोठ्या उत्साहात केले आहे. या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुनिल गंगुले व महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.रमेश झरेकर, डॉ.रामदास पवार, प्रा. दिलीप सोनवणे, डॉ.विजय निकम, महाविद्यालयीन अधीक्षक श्री वसंत पवार, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.सदर उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.एस.आर. थोपटे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा खेळाचा आनंद घेऊन आपले शारीरिक, मानसिक आरोग्य वृद्धिंगत करून एस.एस.जी.एम. कॉलेजचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले. सदर स्पर्धेत क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ, अॅथेलॅटीक्स इ. खेळ प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा संचालक प्रा.सुभाष देशमुख यांनी केले. तसेच क्रीडा नियोजन व संयोजन प्रा.शिवप्रसाद जंगम, प्रा.आकाश लकारे व प्रा. मयूर साठे या क्रीडा संचालकांनी केले असून, त्यांना महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षेकेत्तर सेवकांनी सहकार्य केले आहे. यामध्ये सर्व शिक्षक शिक्षेकेत्तर सेवकांनी व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने महाविद्यालयात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.