खेळजगत
साईबाबा महाविद्यालयात भूगोल दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात भूगोल भूगोल दिनानिमित्त वक्तृत्व,प्रश्नमंजूषा आणि भित्तिचित्रे सादरीकरण अशा विविध स्पर्धा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,दिलीप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका मैथिली पितांबरे,प्राचार्य विकास शिवगजे,मुख्याध्यापक गंगाधर वरघुडे,अधिक्षक संजय धनेश्वर,नजमा सय्यद,एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे भूगोलाचे प्रा.डॉ,देविदास रणधीर,प्रा.अमोल कचरे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राचार्य विकास शिवगजे म्हणाले की, मकर संक्रांती बरोबर १४ जानेवारी हा दिवस जागतिक भूगोल दिन म्हणून राज्यातील शालेय पातळीवर मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात.योगायोगाने भूगोल महर्षि डॉ.सी.डी.देशपांडे यांचा १४ जानेवारी हा जन्मदिवस आहे.‘भूगोल दिन’ एका अर्थी ऋतुबदल होण्याचा हा दिवस सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. तारखेनुसार उत्तरायणाची सुरुवात २२ डिसेंबर रोजी असली तरी भारतीय तिथीनुसार ती पौष महिन्यात म्हणजे जानेवारीत होते. तसेच १४ जानेवारी रोजी येणाऱ्या मकरसंक्रांतीतील सूर्य धनू राशीतून मकरराशीत प्रवेश करतो. सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा काळ साधारणपणे एक महिना असतो. अशा बारा राशीतून बारा महिने त्याचा प्रवास सुरू असतो. १४ जानेवारी रोजी होणाऱ्या मकरसंक्रमणात सूर्याच्या ऊर्जेचे संक्रमण होते. म्हणून हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रा.डॉ. देविदास रणधीर यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे भौगोलिक व्याख्यान दिले. मुख्याध्यापक गंगाधर वरघुडे,प्रा.अमोल कचरे यांनी मनोगत विकत केले. यावेळी अधिक्षक राजेंद्र कोते ,दिनेश कानडे,मनोज बकरे,प्रशांत शेळके, डॉ.सुनिता वडीतके,प्रा.कांचन चौधरी,प्रा.सरिता लावरे,प्रा.सीमा सोनवणे,प्रा.दत्तात्रय लांडे,प्रा.उषा गायके यांच्यासह व विद्यार्थी-कर्मचारी उपस्थित होते. प्रा.वंदना देशमुख यांनी प्रास्तविक केले,प्रा.रंगनाथ रहाणे यांनी सूत्रसंचालन आणि प्रा.सोनाली हरदास यांनी आभार मानले.