खेळजगत
आत्मा मालिकमध्ये तिसरी राज्यस्तरीय शालेय अंध मुलांची क्रिकेट स्पर्धा
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र व सोनी पिक्चर्स नेटवर्कस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मा मलिक क्रिकेट अकादमी कोकमठान(शिरडी)येथे दिनांक २३ ते २५ जानेवारी रोजी राज्यस्तरीय शालेय अंध मुलांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण आठ शालेय संघांनी भाग घेतला असून १० षटकांचे सामने खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उदघाटन कोपरगांव महसूल विभागाचे अधिकारी तागंडे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेचे नाणेफेक संस्थेचे सचिव रमाकांत साटम यांच्या हस्ते झाले. ज्ञानज्योती नागपुर व श्री शिवाजी विद्यालय लातूर यांच्यात उदघाटन सामना झाला. यामध्ये साखळी पद्धतीने ८ संघ खेळणार आहेत
‘अ’ गटात – नागपूर संघाने १० षटकात ५ गडी गमावून ८३ धावा केल्या.प्रत्युत्तरादाखल शिवाजी विद्यालय लातूर यांनी ८४ धावा दोन गडी गमावून सामना जिंकला. पवन अडकिने यास सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
दुसऱ्या मैदानावर कोरेगाव पार्क शाळा व चाळीसगाव शाळा यांच्यात सामना रंगला. कोरेगाव शाळेने १० षटकात चार गडी गमावून १२१ धावसंख्या रचली. चाळीसगाव संघ १० षटकात तीन गडी गमावून ८५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. ३६ धावांनी कोरेगाव पार्क शाळेने हा सामना जिंकला. मारुती कांबळे यास सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
याप्रसंगी आयोजक संस्थेचे अध्यक्ष रवि वाघ खजिनदार, दादाभाऊ कुटे, उपाध्यक्ष दिलीप मुंडे, गणेश काळे, दिलीप शीलवंते आदी मान्यवर उपस्थित होते.