खेळजगत
आत्मा मालिकला राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेतील खेळाडुंना प्रशिक्षण देण्याचा मान
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
नाशिक येथील 26 महाराष्ट्र ट्रायबल पब्लीक स्कुल सोसायटी व्दारा आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य व कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपिठ व्दारा आयोजित एकलव्य निवासी शाळा राष्ट्रिय स्तरावरील क्रिडा स्पर्धा पुर्वीचे निवासी सराव शिबीर कोपरगावच्या आत्मा मालिक क्रिडा संकुलामध्ये राज्यातील 557 खेळाडुंना प्रशिक्षण देण्याचा मान आत्मा मालिक क्रिडा संकुलाला नुकताच मिळाला आहे.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केंद्र शासनाच्या एकलव्य निवासी शाळा आदिवासी विभागाच्यावतीने दुसऱ्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन मध्यप्रदेशातील भोपाळ येथे 9 ते 14 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील 25 शाळांमधुन 557 खेळाडू 16 विविध क्रिडा प्रकारामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. या सर्व खेळाडूंची तयारी राज्याच्यावतीने आत्मा मालिक क्रिडा संकुलाकडे सोपविण्यात आली आहे.
कोकमठाण येथे बॅडमिंटन, फुटबाॅल, बास्केटबाॅल, बाॅक्सींग, कराटे, तायक्वोंदो, आर्चरी, रेसलींग, अॅथलॅटीक्स, हाॅलीबाॅल, हाॅकी, कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस,आदी सोळा प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण आत्मा मालिक क्रिडा संकुलाच्या 19 क्रिडा मैदानावरती 38 तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत दिले जाणार आहे. बॅडमिंटनसह इनडोअर गेम खेळांसाठी अद्यावत सिंथेटीक क्रिडांगण तयार करण्यात आले आहे. या सर्व क्रिडा प्रकाराच्या स्पर्धेच्या तयारीसाठी आदिवासी विभागाच्या राज्यातील 557 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.
अध्यात्मीक परिसरामध्ये आदिवासी विभागाचे मुले खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत. खेळाबरोबर ध्यानधारणा करून आत्म चिंतन केल्यास आत्म्याची ओळख होते. मनाची एकाग्रता वाढल्याने खेळामध्येे खेळाडू यश संपादन करण्यात यशस्वी होतात- परमानंद महाराज
दरम्यान आदिवासी विभाग मंत्रालयाच्या प्रतिनिधी सिध्दी मेहता, समन्वयक प्रकाश आंधळे, टी. कालतीनाथन, क्रिडा प्रशिक्षक राजेंद्र ठाकरे, आत्मा मालिक संकुलाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, विश्वस्त प्रकाश भट यांनी प्रशिक्षणार्थी खेळाडूंची पहाणी करून योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी सिध्दी मेहता,नंदकुमार सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आत्मा मालिक ध्यानपिठाचे संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, संरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, वसंतराव आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मा मालिकचे सर्व प्रशिक्षक परिश्रम घेत आहेत.