जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात पोलिसांचा छापा,मोठा ऐवज जप्त,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गावठी हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येत असल्याची गुप्त खबर शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्यानुसार केलेल्या कारवाईत विविध रसायन व अन्य अवैज असा सुमारे ०१ लाख २१ हजारांचा अवैज जप्त केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे अवैध व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात अवैध व्यवसायाची अशीच घटना नूकतीच समोर आली असून यात चासनळी येथील हद्दीत शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना एक खबऱ्याकडुन एक बातमी मिळाली होती त्या नुसार चासनळी हद्दीत गोदावरी नदी पात्रातील खडकाळ भागात काही नागरिक अवैधरित्या गावठी दारू पाडत असल्याची खबर त्यांना मिळाली होती.त्यानुसार त्यांनी आपले पथक त्या ठिकाणी पाठवले असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमानवर अवैध दारू पाडण्याचे काम सुरु असल्याचे दिसून आले आहे.

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा आणि बेकायदा व्यवसायाचा सुळसुळाट झाला आहे.दुचाकी,चारचाकी चोऱ्यासह अन्य भुरट्या चोऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.त्यामुळे शहरातील नागरिक आणि तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना शांतचित्त झोप अशक्य झाली आहे.या संबंधी राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी काही दिवसापूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.मात्र अद्याप तरी त्याचे सकारात्मक परिणाम समोर येऊन नागरिकांची सुटका झालेली नाही.अवैध व्यवसायाची अशीच घटना नूकतीच समोर आली असून यात तालुक्यातील चासनळी येथील हद्दीत शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना एका खबऱ्याकडुन एक बातमी मिळाली होती त्या नुसार चासनळी हद्दीत गोदावरी नदी पात्रातील खडकाळ भागात काही नागरिक अवैध रित्या गावठी दारू पाडत असल्याची खबर त्यांना मिळाली होती.त्यानुसार त्यांनी आपले पथक त्या ठिकाणी पाठवले असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध दारू पाडण्याचे काम सुरु असल्याचे दिसून आले आहे.त्या ठिकाणी धाड टाकून तेथील गावठी दारू पडण्याचे साहित्य व विविध रसायन आदी जप्त करून त्या ठिकाणी नष्ट केले आहे.तर विविध साहित्यासह सुमारे ०१ लाख २१ हजारांचा अवैज जप्त केला आहे.

दरम्यान त्यात ८४ हजार रुपये किमतीचे १२०० लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन (आंबट उग्र वासाचे किं.अं.)आरोपी विशाल कृष्णा दळे रा.माणकेश्वर नगर,चासनळी ता.कोपरगाव याकडे ३१ हजार ५०० रु.किमतीचे ४५० लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन (किं.अं.)२ हजार रूपये किमतीची २० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू (आंबट उग्र वासाची किं.अं.)असा एकूण ०१ लाख २१ हजार ५०० रुपयांचा अवैज जप्त केला आहे.

दरम्यान यातील आरोपी शिवाजी संपत माळी,मिथुन छगन माळी रा माणकेश्वर नगर,चासनळी ता.कोपरगाव आदी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम-६५(फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.अप्पासाहेब थोरमिसे,पोलीस नाईक अशोक शिंदे,पो.कॉ.दिनेश कांबळे,शाम जाधव आदींनी यशस्वी केली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close